पीएम किसान योजना ! मोठा निर्णय, अशा लोकांच्या खात्यात नाही येणार पैसे
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे.
याअगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात १० हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत. मात्र आता शेतकरी ११ व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र केंद्र सरकारकाडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात येणार आहेत.पण असे अनेक लोक आहेत ज्यांच्या खात्यात सरकार यावेळी ही रक्कम ट्रान्सफर करणार नाही. खरं तर, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी सरकारने PM किसान खात्याची e-kyc करणे अनिवार्य केले आहेत.अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे खाते ईकेवायसी (e-kyc) आतापर्यंत झाले नाही, त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पीएम किसान खात्याच्या ईकेवायसीची अंतिम तारीख 31 मे आहे.
यापूर्वी केवायसी अपडेट (KYC update) करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती, मात्र ती आता ३१ मे करण्यात आली आहे. एका आकडेवारीनुसार, आतापर्यंत 80 टक्के लोकांनी 11व्या हप्त्यासाठी KYC अपडेट केले आहे.त्याच वेळी, 20 टक्के लोकांनी अद्याप ते अपडेट केलेले नाही. तुम्ही वेळेत अपडेट न केल्यास, पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जाणार नाहीत. जर तुम्हाला या योजनेचा सतत लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया करा, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.याप्रमाणे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आता किसान कॉर्नर पर्यायावर eKYC लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.


0 Comments