मोहोळ-पंढरपूर रोडवर भीषण अपघात ; 6 जागीच ठार ; मोहोळचे डॉक्टर पती-पत्नी व 2 मुले ठार
सोलापूर : पंढरपूर मोहोळ महामार्गावर पेनूर जवळ स्कॉर्पिओ व मारुती सेलेरिओ या दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे उर्वरित जखमींना 108 क्रमांकच्या रुग्णवाहिकेमधून पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहे. या अपघातामध्ये मोहोळ शहरातील डॉक्टर पती-पत्नीचा मेव्हणे व त्यांची पत्नी तसेच त्यांच्यासह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
डॉ आफरिन अत्तार,डॉ मुजाहिद अत्तार, मेव्हणे इरफान खान,त्यांची पत्नी व त्यात दोन मुलं असे सहा जण जागीच ठार झाले आहेत पंढरपूर मोहोळ या महामार्गावर यापूर्वी अनेक मोठे अक्सिडेंट झालेले आहेत. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गाडीला कारने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर हा अपघात झाला आहे चार पदरी रस्ता झालेला असताना समोरासमोर अपघात कसा झाला याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ अत्तार हे सेलेरिओ गाडीतून पंढरपूर हून मोहोळकडे निघाले होते, तर स्कॉर्पिओ ही गाडी सोलापुरातून लग्न आटपून पंढरपूर गादेगाव कडे निघाले होते या स्कॉर्पिओ गाडी मधील तीन जण जखमी झाले आहेत, राजेंद्र हुंडेकरी रामचंद्र शेटे मंदाकिनी शेटे या तिघांसह सहा जण जखमी झाले असून त्यांना पंढरपूर कडे उपचारासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली. सर्व मयत यांना मोहोळ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे यामध्ये शासनाच्या 108 क्रमांक रुग्णवाहिकेच्या पथकाची मदत मिळाल्याचं पाहायला मिळालं.


0 Comments