google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय, ‘या’ महिन्यात मिळणार 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान..!

Breaking News

शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय, ‘या’ महिन्यात मिळणार 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान..!

 शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय, ‘या’ महिन्यात मिळणार 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान..!


राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. महात्मा जोतिराव फुले योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 20 हजार 250 कोटींचा भार पडला होता…


ठाकरे सरकारच्या या कर्जमाफीपासून राज्यातील अनेक शेतकरी वंचित राहिल्याची ओरड होत होती. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.


दरम्यानच्या काळात देशासह महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट कोसळलं नि सारं काही ठप्प झालं.. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला.. निधीअभावी ठाकरे सरकारवर साऱ्या योजना काही काळासाठी बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ आली.. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी निधीची कमतरता निर्माण झाली.. 


मात्र, आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय.. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबतची अंमलबजावणी सरकारने सुरु केली आहे.. त्यामुळे लवकरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाण्याची शक्यता आहे..


20 लाख शेतकऱ्यांना लाभ

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, उपमुख्यमंत्री पवार यांनी माहिती दिली होती. राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी 10 हजार कोटी रुपये लागणार असल्याचे ते म्हणाले होते..


दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी करताना राज्य सरकारसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ते म्हणजे, प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली खरी, पण त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील, याचा डेटा शासनाकडे असणं आवश्यक आहे. त्यासाठी शासन निर्णय घेऊन पुढील अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान जून उजाडण्याची शक्यता आहे..


‘या’ शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. 2017-18, 2018-19 व 2019-20 या तीन वर्षांत नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाच या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.


तसेच, ठाकरे सरकारने 2022-23 हे वर्षे ‘महिला शेतकरी सन्मान वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..


नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांची यादी निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून सहकार आयुक्त कार्यालयाकडे पाठवली जाईल. सहकार आयुक्त कार्यालयाकडे माहिती गेलेल्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले..

Post a Comment

0 Comments