अखेर महापालिका निवडणूक आरक्षण 27 मे ते 13 जूनपर्यंत सोडत कार्यक्रम जाहीर…
राज्यात सद्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाहीत, असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होत. यामध्ये निवडणूक आयोग पावसाळ्यात निवडणूक पुढं ढकलणार याबाबत अंदाज लावण्यात येत होते पण..आरक्षण सोडतीमध्ये पावसाळ्यात अती मुसळधार कोकणातील महापालिकांचाही समावेश करण्यात आला आहे.
प्राप्त बातमीनुसार नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, वसई-विरार या अतीमुसळधार विभागातील महापालिकांचाही समावेश केला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिकेला 31 मे रोजी आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत.
तर मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहाणार आहे. मुंबई महापालिका अतिमूसळधार विभागात येत असूनही राज्य निवडणूक आयोगाचे वॉर्ड निहाय आरक्षण सोडत काढण्याचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ( राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 13 जूनपर्यंत जाहीर केला आहे.


0 Comments