26 वर्षीय सावत्र मुलाकडून ३६ वर्षाच्या आईवर बलात्कार ; व्हिडीओ व्हायरलची धमकी देत .....
पुणे : सावत्र मुलगा असलेल्याने आपल्या आईवरच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्या दिराने घरातील ६ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. तसेच या बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५०४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिचा सावत्र मुलगा (वय २६), दीर(वय ५०) आणि एका अनोळखी व्यक्ती (वय २२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० एप्रिल ते १० मे दरम्यान कोंढव्यात घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा २६ वर्षाचा सावत्र मुलगा आहे. त्याने फिर्यादी यांच्यावर या काळात दोन वेळा जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. त्यांच्या ५० वर्षाच्या दिराने त्यांच्या घरी येऊन ६ लाख रुपयांचे कपाटातील १५ तोळे सोन्याचे दागिने लबाडीने चोरुन नेले.
त्यांच्या सावत्र मुलाने बलात्कार करतानाचा व्हिडिओ काढला होता. एका व्यक्तीने त्यांच्या घरी येऊन तुमचा सावत्र मुलाबरोबरचा व्हिडिओ आहे. तुला दीराबरोबर ‘झोपावे’ लागेल, नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीने घाबरुन फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.


0 Comments