google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुर जिल्ह्यात 25 हेक्टर महारवतनी जमिनीवर वन विभागाच्या घुसखोरी ? ; न्यायासाठी शेतकरी फिरताहेत इकडे-तिकडे

Breaking News

सोलापुर जिल्ह्यात 25 हेक्टर महारवतनी जमिनीवर वन विभागाच्या घुसखोरी ? ; न्यायासाठी शेतकरी फिरताहेत इकडे-तिकडे

 सोलापुर जिल्ह्यात 25 हेक्टर महारवतनी जमिनीवर वन विभागाच्या घुसखोरी ? ;

न्यायासाठी शेतकरी फिरताहेत इकडे-तिकडे 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील गट क्रमांक 29, 30, 31 व 33 मिळकतीमध्ये वन विभागाचे अधिकारी बेकायदेशीरपणे व गुंडगिरीची भाषा करत घुसखोरी करत असल्याची तक्रार संजवाड येथील समस्त महारवतनी शेतकऱ्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली होती. दरम्यान गुरुवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांना निवेदन देण्यात आले.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील शेत जमीन गट नंबर 29 क्षेत्र 11 हेक्टर 91 आर, शेतजमीन गट नंबर 30 क्षेत्र 4 हेक्टर 21 आर, गट नंबर 31 क्षेत्र 3 हेक्टर 90 आर व गट नंबर 33 क्षेत्र 7 हेक्टर 81 आर ही वन विभागाची जमीन दिनांक 6 जून 1987 रोजी शेतजमीन म्हणून संजवाड येथील समस्त महारवतनी शेतकऱ्यांना अटी व शर्तीसह अधीन राहून देण्यात आली होती. त्यानंतर फेरफार क्रमांक 275 अन्वये सहा ऑगस्ट 1987 रोजी सरकारी फॉरेस्ट हे नाव कमी करून प्रत्येकांच्या सातबारा उताऱ्यावर नोंदी करण्यात आल्या.


मागील काही दिवसांपासून वन विभागाच्या वतीने बेकायदेशीर व दंडेलशाहीच्या जोरावर वतनदारांच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये घुसखोरी सुरू असल्याचा प्रकार चालू आहे वन विभागातील वनपाल सावंत हे शेतकऱ्यांना उलट-सुलट बोलून उद्धट वर्तन करीत आहेत, महारवतनी जमीन लाटण्याचा वन विभागाचा डाव असल्याची तक्रार रेवणसिद्ध निंगप्पा बनसोडे, लक्ष्मण बनसोडे यांच्या काळात इतर शेतकऱ्यांनी शासन दरबारी केली आहे


गुरुवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सोलापूर दौऱ्यावर असताना या शेतकऱ्यांनी शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments