google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Solapur Murder : आधी हत्या , मग कोरड्या विहिरीत मृतदेह फेकला ! अखेर मारेकऱ्यांना पोलिसांनी गाठलंच

Breaking News

Solapur Murder : आधी हत्या , मग कोरड्या विहिरीत मृतदेह फेकला ! अखेर मारेकऱ्यांना पोलिसांनी गाठलंच

 Solapur Murder : आधी हत्या , मग कोरड्या विहिरीत मृतदेह फेकला ! अखेर मारेकऱ्यांना पोलिसांनी गाठलंच

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील एका कोरड्या विहिरीत तरूणाचा मृतदेह 

 सापडल्यामुळे खळबळ माजली होती.त्यानंतर वळसंग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्याची हत्या  झाल्याचे उघड झाले आहे. नरेश चिंता असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. नरेशची हत्या करून रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह कोरड्या विहिरीत टाकण्यात आला होता. त्यामुळे आरोपींचा शोध धेणे कठीण जात होते. मात्र वळसंग पोलिसांनी कसून तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्त. दरम्यान आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून हत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. 


हत्या केल्यानंतर कोरड्या विहिरीत फेकला

विडी घरकुल कुंभारी येथील साई स्वरुप हॉटेलचे मालक गणेश माळी यांच्या हॉटेल शेजारील कोरड्या विहिरीत एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर सदर तरुणाच्या डोक्याला उजव्या बाजूस जखम झाल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डोक्याला मार लागल्याने जखम होऊन कवठी फुटून तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आरोपींना न्यायालयाकडून पोलिस कोठडी


मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जवळपास 80 व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मयताचे फोटो आणि वर्णन व्हायरल केले.तसेच ग्राम सुरक्षा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात मॅसेज व फोटो व्हायरल करण्यात आले. याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यात आले. यावेळी पोलिसांना मृतदेह विहिरीत टाकतानाचे फुटेज प्राप्त झाले. मयत तरुणाच्या वडिलांनी शेजाऱ्याच्या मोबाईलवर फोटो व वर्णन पाहिले असता पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर मयत तरुणाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

Post a Comment

0 Comments