जिल्हापरिषद,महापालिका व नगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे : खा सुप्रियाताई सुळे
सांगोला : तालुका प्रतिनिधी लोकसभेतील उत्कृष्ट संसदपटू आणि संसदरत्न म्हणून देशाच्या राजकारणात ओळखल्या जाणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे दि 20 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या या दरम्यान त्यांनी बंजारा समाजातील महिलांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशस्वीनी अभियानातील महिलांचा मेळावा घेवून त्यांच्याशी सुसंवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. व यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भरगच्च बैठक घेवून सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या.
बुधवार दि २० रोजीच्या दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर व श्री मार्कंडेश्वर मंदिरांना भेट देऊन त्यांचे दर्शन घेतले. खा. सुप्रियाताई सुळे यांचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा यशस्वी झाल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
गुरुवार दि 20 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्याने नेहमीच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर व राष्ट्रवादी काँग्रेसवर भरभरून प्रेम केले आहे. यामुळेच पवार कुटुंबीयांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच सोलापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिले आहे. हीच परंपरा आणि वारसा जिल्ह्यातील मतदार पुढे चालवतील. असा विश्वास व्यक्त करून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात येणार्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर पालिका व नगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागावे असे आवाहन केले
या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवावे असे सांगून पक्षातील सर्व अंतर्गत मतभेद विसरून पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केल्यास संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय होईल असा विश्वासही शेवटी सुप्रियाताईंनी व्यक्त केला.


0 Comments