google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग सोलापूर वेश्याव्यवसायातील टोळी पोलिसांच्या तावडीत ; टोळीत 3 महिला 2 पुरुषांचा समावेश

Breaking News

ब्रेकींग सोलापूर वेश्याव्यवसायातील टोळी पोलिसांच्या तावडीत ; टोळीत 3 महिला 2 पुरुषांचा समावेश

 ब्रेकींग  सोलापूर  वेश्याव्यवसायातील टोळी पोलिसांच्या तावडीत ;

टोळीत 3 महिला 2 पुरुषांचा समावेश

सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील रेणुका नगर, बॉम्बेपार्क, जुळे सोलापूर, येथील विवेकानंद केंद्राजवळील एका घरात महिलेस वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवुन तिच्याकडून एजंटा मार्फत वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या 


सहाय्य पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे यांनी सपोनि नंदकिशोर सोळुंके यांचेपथकासह छापा टाकुन वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या पिडीतेची सुटका केली आहे.. याकारवाई मध्येरूकसार जावेद खान, रा. कुर्बान हुसेन नगर, तालुका पोलीस ठाणे जवळ, सोलापूर २) रंजना धनंजय ठाकुर, रा. मुजावर यांचे घरात भाड्याने, विवेकानंद केंद्राजवळ, रूबी नगर, सोलापूर, ३) सुचित्रा ज्ञानेश्वर जाधव, रा. होटगी, साईबाबा मंदिरजवळील पाण्याचे टाकीमागे, सोलापूर, 


सद्या- गायकवाड यांचे घरात भाड्याने रेणुका नगर, बॉम्बे पार्क, सोलापूर, तसेच एजंट ४) धनंजय प्रितम बिडला, रा. रूबी नगर, बॉम्बेपार्क, जुळे सोलापूर, व ५) ऋषीकेश बळवंत अर्जुन, रा. सावली सोसायटी, इंदिरा नगरचे पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर यांना पिडीत महिलेस वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवुन तिस पैशाचे अमिष दाखवून तिचेकडून वेश्याव्यवसाय करून घेवुन तिच्या येणाऱ्या कमाईवर 


स्वतःची उपजिवीका करीत असलेबाबत विजापूरनाका पोलीस ठाणेस  अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६ सह भादंवि ३७० (अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. यातील आरोपी क्र.१ रूकसार जावेद खान ही विजापूर नाका पोलीस ठाणे मध्ये अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६ सह भादंवि ३७० (अ) (२) या गुन्ह्यात देखील पाहिजे असुन तिला पकडण्यात यश आले आहे.

 

ही कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रिती टिपरे, स.पो.नि. नंदकिशोर सोळुंके, पोह अशोक लोखंडे, पोना शितल शिवशरण, पोना सचिन बाबर, पोना विनायक बर्डे, पोशि भारत पाटील, दामिनी पथकातील मपोना दिपाली माळी, मपोशि कविता कुंभार, मपोशि  कल्यानी माने, मपोशि तेजस्विनी खराटे व मपोशि विद्या जाधव यांनी पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments