घेरडीचे सोमा (आबा) मोटे बनले रासपचे सरचिटणीस
सांगोला तालुक्यात आबा मोटे यांच्या रूपाने मोटे पद पहिल्यांदाच मिळाले आहे. 1998 पासून ते एकनिष्ठ आहेत. सांगोला तालुक्यात एक धाडसी नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. न्यायी भूमिका, सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी 24 तास उपलब्ध असतात. माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्वच सत्तास्थाने यांच्याच ताब्यात आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोमा (आबा) मोटे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्यावर घेरडीसह सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
सोमा (आबा) मोटे यांना निवडीचे पत्र फलटण येथील महाराजा मल्टिपर्पज हॉल येथे राज्याचे अध्यक्ष काशिनाथ कोलते, राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, माण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्षा वैशालीताई वीरकर, सुनील बंडगर तसेच मनेर चाचा यांच्या हस्ते देण्यात आले. गुरुवार, 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता हे निवडीचे पत्र देण्यात आले.
सांगोला तालुक्यात आबा मोटे यांच्या रूपाने मोटे पद पहिल्यांदाच मिळाले आहे. 1998 पासून ते एकनिष्ठ आहेत. सांगोला तालुक्यात एक धाडसी नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. न्यायी भूमिका, सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी 24 तास उपलब्ध असतात. माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्वच सत्तास्थाने यांच्याच ताब्यात आहेत.
कोण आहेत सोमा (आबा) मोटे?
सोमा (आबा) मोटे हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते व रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे निकटवर्तीय, विश्वासू सहकारी मानले जातात. ते 1998 पासून आजतागायत महादेव जानकर यांच्यासमवेत काम करीत आहे. या काळात कित्येक जणांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडचिठ्ठी दिली मात्र सोमा (आबा) मोटे यांनी एकनिष्ठ राहून जानकर यांचे हात बळकट करण्याचे काम केले. मा. महादेव जानकर यांची पूर्वीची यशवंत सेना ही संघटना व सध्याचा राष्ट्रीय समाज पक्ष या दोन्ही संघटनांत सोमा (आबा) मोटे यांनी जोमाने काम केले आहे.
मागील 7 वर्षांपासून सोमा (आबा) मोटे हे रासपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक निवडणूक पार पडल्या आहेत. रासपचे जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून सोमा (आबा) मोटे यांच्याकडे पाहिले जाते.
सोमा (आबा) मोटे यांची राजकीय वाटचाल
समाजकारणातून राजकारणात प्रवेश केल्यापासून आजतागायत सोमा (आबा) मोटे यांनी महादेव जानकर यांची साथ सोडली नाही. तब्बल 23 वर्षांपासून ते आजतागायत जानकर यांच्यासोबत आहेत. रासप हा राज्यात भाजपसोबत सत्तेत भागीदार पक्ष असतानाही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सोमा (आबा) मोटे यांनी काम केले.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्याने रासप व भाजप हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. जर असे न घडता भाजप व रासपची सत्ता राहिली असती तर सोमा (आबा) मोटे यांना विधानपरिषद अथवा महामंडळाचे अध्यक्षपद निश्चित मिळू शकले असते असे राजकीय जाणकार मत मांडतात.
अफाट संघटन व गोरगरिबांना न्याय
सोमा (आबा) मोटे हे स्वतः तरुण असले तरी तरुण कार्यकर्त्यांसोबतच बुजुर्ग मंडळीही त्यांना मानतात. उत्साही तरूण नेता, युवक संघटन मजबूत असणारा संघटक, मदतीला धावून जाणारा नेता अशी सोमा (आबा) मोटे यांची घेरडी गटात ओळख आहे.
मागील काळात सोमा (आबा) मोटे यांनी असंख्य विकासकामे केली आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत रासप व शेकापने युती करून घेरडी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. रासप व शेकापचे या ग्रा.पं. मध्ये 9 सदस्य आहेत. ही राजकीय घटना सोमा (आबा) मोटे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी आहेे.
घेरडी जि.प. गटाचे भौगोलिक स्वरुप
घेरडी गटात घेरडी, हंगिरगे, पारे, नराळे, गावडेवाडी, हबिसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी, भोपसेवाडी, बुरंगेवाडी, सोनंद, गळवेवाडी, डोंगरगाव, डिकसळ आदी गावे येतात. हा गट सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. सोमा मोटे हे स्वतः या सर्वच गावांत मोंठा जनसंपर्क ठेवून आहेत. केवळ निवडणुकीपुरते लोकांकडे न जाता ते सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात.
लोकांना शक्य ती आर्थिक मदत, शासकिय कामे, न्याय देण्याची भूमिका त्यांची आहे. शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचे बंधू पिंटू पुकळे यांचे हत्तीचे बळ मिळाल्याने सोमा आबा मोटे धडाडीने काम करताना दिसतात.
यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच
आगामी जिल्हा परिषद निवडणूक रासप व शेकापच्या युतीतून लढविण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक लढविण्यावर मोटे ठाम आहेत.


0 Comments