google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Breaking News

सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 

सांगोला (प्रतिनिधी): संपूर्ण मानवी समाजाला समतेची शिकवण देणारा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक वर्षी 14 एप्रिलला त्यांचा जन्मोत्सव हा त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे 


अध्यक्ष डॉ. दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमात डी. फार्मसी प्रथम वर्षाच्या कु. प्रियांका करे हिने आपल्या मनोगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिली.


शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी त्यांनी केली. त्यांनी भारत देशाचे संविधानाची निर्मिती केली. त्यांचे भारतीय इतिहासातील व राष्ट्रीय विकासातील योगदान बहुमौलय आहे.


 स्त्री शिक्षण, समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह विरोध, अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन यासंबंधित त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे विचार मांडले. तसेच महाविद्यालयात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक , सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार ” या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. 


यावेळी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना महाविद्यालयतर्फे अल्पउपहार देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन प्रा. भारत गरंडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भारत गरंडे, प्रा. एन. एन. माळी, डॉ. एम. जी. शिंदे प्रा. आर. एम. कोळी प्रा.वि.पी. अनेकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments