google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डोंगरगावचा बॉडी बिल्डर संकेत काळे ठरला जुनिअर मिस्टर युनिव्हर्स

Breaking News

डोंगरगावचा बॉडी बिल्डर संकेत काळे ठरला जुनिअर मिस्टर युनिव्हर्स

 डोंगरगावचा बॉडी बिल्डर संकेत काळे ठरला जुनिअर मिस्टर युनिव्हर्स 

 इंडियन बॉडिबिल्डींग अँड फिटनेस फेडरेशनने दि. १५,१६ व १७ एप्रिल 2022 रोजी बालेवाडी, पुणे येथे आशिया खंडातील सगळ्यात मोठा बॉडीबिल्डिंग क्रिडा क्षेत्रातील क्रीडा महोत्सव आयोजीत केला होता. त्यात नॅशनल चॅम्पीयन महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डर  


पुणे विद्यापिठाचा विद्यार्थी संकेत संजय काळे याने ज्युनिअर मिस्टर युनिव्हर्स सिल्वर मेडल (द्वितीय क्रमांक ) मिळवून क्रीडा जगतामध्ये  डोंगरगावचे आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशात उंचावण्याचे अतुलनीय काम केले आहे.


 या स्पर्धेत जगातील साठ (60) देशातील बॉडीबिल्डर खेळाडूंचा सहभाग होता. त्यामध्ये संकेतने सिल्वर मेडल मिळवल्यामुळे क्रीडा जगतातून आणि क्रीडाप्रेमी  कडून बॉडी बिल्डर संकेतवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. याच स्पर्धेत संकेतने सिनिअर गटात ही मिस्टर युनिव्हर्स चौथे स्थान पटकावले आहे.


या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत संकेतने प्रथम पटकावला आहे.

संकेत याने यापूर्वीही राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केले आहे. ज्युनियर मिस्टर इंडिया, ज्युनियर महाराष्ट्र श्री, राज्यस्तरीय विद्यापीठ बॉडीबिल्डिंग ९० किलो वजनी गटात दोन वेळा सुवर्ण पदक, पुणे विद्यापीठ झोनल स्पर्धेत २ वेळा सुवर्ण पदक, नॅशनल बॉडी २


 बिल्डिंग स्पर्धेत दोन वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग व पारितोषिके मिळविली आहेत. संकेत काळे याच्या कुटुंबाने त्याला त्याचे इच्छेप्रमाणे 'बॉडी बिल्डिंग' क्षेत्रात करियर करण्यास नेहमीच पाठबळ दिले आहे. संकेतने मिळविलेल्या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments