google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्याचे प्रगल्भ राजकारण

Breaking News

सांगोल्याचे प्रगल्भ राजकारण

 सांगोल्याचे प्रगल्भ राजकारण


सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असला तरी इथला माणूस मनाने आणि कर्तृत्वाने मोठा असल्याचे नेहमी सिद्ध झाले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सांगोल्याचे सुसंस्कृत आणि ध्येयनिष्ठ राजकारण.

एरव्ही राजकारण म्हटलं की, गुंडागर्दी, दडपशाही आणि टोकाची मतभिन्नता डोळ्यासमोर येते. राजकीय वर्चस्वापोटी विरोधाला विरोध होतो आणि त्याचे परिणाम तेथील विकासावर होत राहतात. निष्पाप जनता विनाकारण भरडली जाते. याला सांगोला तालुका अपवाद राहिला आहे. कारण सांगोल्याचे आजवरचे राजकारण प्रगल्भतेचा वस्तुपाठ घालून देणारे आहे.


सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असला तरी इथला माणूस मनाने आणि कर्तृत्वाने मोठा असल्याचे नेहमी सिद्ध झाले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सांगोल्याचे सुसंस्कृत आणि ध्येयनिष्ठ राजकारण.


सांगोला तालुक्याच्या राजकीय पटलावर प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाच्या कै. आ. गणपतराव देशमुख यांच्या डाव्या विचारसरणीचा प्रभाव जाणवतो. मात्र त्यांच्याही पूर्वी या तालुक्याचे नेतृत्व केलेल्या धुरिणांनी या आदर्शवादी राजकारणाची पायाभरणी केली. त्या ध्येयनिष्ठ राजकारणाला कै. आ. गणपतराव देशमुख यांनी कळस चढविला.


1952 ते 1962 पर्यंत 10 वर्षे सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून काँग्रेसचे कै. केशवराव राऊत (मेडशिंगी) यांनी नेतृत्व केले. सन 1962 मध्ये गणपतराव देशमुख पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी त्यांनी कोळे भागात बुद्धेहाळ येथे इंग्रजांनी बांधलेल्या तलावात त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीला मोबदला मिळावा

 म्हणून गणपतराव देशमुख यांनी 1958 च्या दरम्यान लढा उभारला. शेतकऱ्यांची वकिली करून त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. 1972 व 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता २०१४ पर्यंत आ. गणपतराव देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. सन 1972 साली कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी आ. गणपतराव देशमुख यांचा पराभव केला होता.


काकासाहेबांची पुण्याई

कै. काकासाहेब साळुंखे-पाटील हे निष्कलंक, निस्वार्थी आणि कर्तबगार नेते म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते. त्यांना मानणारा अठरा पगड जातींचा वर्ग होता. निवडून आल्यानंतर त्यांनी तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले. मात्र त्यांचे जीवनमान अल्पायुषी ठरले. त्यांचे निधन झाल्याने तालुक्याच्या राजकारणात त्या काळात मोठी पोकळी निर्माण झाली. ते आणखी काही वर्षे जगले असते तर तालुक्याच्या विकासाला बळ मिळाले असते. कै. साळुंखे-पाटील यांनी 1958 साली विद्या विकास मंडळ जवळे या शिक्षक संस्थेची स्थापना केली.


आ. देशमुख यांनी घडविला इतिहास

एकाच पक्षातून, एकाच मतदारसंघातून 11 वेळा विधानसभा निवडणूक निवडून येण्याचा विक्रम आ. देशमुख यांच्या नावावर आहे. सांगोला शेतकरी सूतगिरणी (1985), शेतकरी महिला सूत गिरणी (2005) या दोन सूत गिरण्या सुरू करूनकै. आ. गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील हजारो हातांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला. यात विशेष म्हणजे,तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे 16 पाणी परिषदा घेवून,सरकारला जागे करून हे पाणी तालुक्यातील शेतीला मिळवून दिले.


कै. आ. गणपतराव देशमुख यांनी क्रांतीअग्रणी कै. नागनाथअण्णा नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी संघर्ष चळवळीचा लढा उभा केला. या लढय़ाने टेंभू-म्हैसाळ प्रकल्पाचे कृष्णेचे पाणी सांगोला तालुक्यात आले. हे पाणी कालवे खोदून शेतकऱ्यांच्याशेतात आणण्याचे त्यांचे ध्येय होते. ते मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाले. याकामी विधानपरिषदेचे आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांची मोठी साथ मिळाली.


नीरा उजवा कालवा फाटा नं. 4 व सांगोला शाखा कालव्याचे पाणी आणण्याचे कामही दोन्ही लोकप्रतिनिधींनी मार्गावर आणले होते. त्यावेळी दीपकआबा साळुंखे-पाटील हे विधान परिषदेच्या सोलापूर मतदारसंघाचे आमदार होते. गणपतराव देशमुख हे तत्कालीन सरकारमध्ये रोजगार हमी योजना मंत्री होते. मोठ्या प्रमाणात शाश्वत स्वरूपाची कामे त्यांनी केली.


ॲड. शहाजीबापू पाटील

1995 साली ॲड. शहाजीबापू पाटील यांनी आ. गणपतराव देशमुख यांचा पाणीप्रश्नावर पराभव केला. त्यावेळी भाजप-सेना सरकारच्या काळात टेंभू-म्हैसाळ योजनेची सुरुवात कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत झाली. कै. आ. गणपतराव देशमुख यांच्या विरोधात शहाजीबापू पाटील यांनी कॉंगेस पक्षाकडून अनेक निवडणुका लढविल्या. मात्र त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. ते नेहमी दुसऱ्या क्रमांकाची मते घेत राहिले. मधल्या दहा वर्षांच्या काळात कॉंगेस पक्षातून अनेकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. शहाजीबापू पाटील शिवसेनेत गेले.


जसे बापू सेनेत गेले तसे ते आमदारही झाले. प्रभावी वक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. 2019 च्या निवडणुकीत आबासाहेबांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांचा पराभव करून त्यांनी तालुक्याची आमदारकीची खुर्ची पटकाविली. ते विद्यमान आमदार आहेत.


दीपकआबा साळुंखे-पाटील

दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी सोलापूर स्थानिक स्वराज संस्था, विधानपरिषद निवडणुकीत विजयी होऊन विकासकामाचा धडाका उडवून दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 


आ. साळुंखे-पाटील यांनी सांगोला तालुक्यात सहकार क्षेत्रात मोठे काम उभारले. म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी पारे तलावात-कोरडा नदीत आणण्यामध्ये त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. हेच दीपकआबा सध्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.देशाचे नेते,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतची जवळीकता संपूर्ण जिल्ह्याला सुपरिचित आहे. दीपकआबानी दुष्काळी सांगोला तालुक्यात सहकारी तत्वावरील साखर कारखाना सुरू केला.


 कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी 1958 साली विद्या विकास मंडळ जवळे या शिक्षक संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. काकासाहेब लावलेल्या या संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर दीपकआबा यांनी वटवृक्षात केले. दीपकआबा यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संघटन कौशल्य. प्रचंड जनसंपर्क, प्रशासकीय पकड, काम करण्याची हातोटी ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये. दीपकआबा यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे.


जयमाला गायकवाड

माजी आ. दीपकराव साळुंखे-पाटील यांच्या भगिनी जयमाला गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून यशस्वीरित्या काम केले. जवळा जिल्हा परिषद गटाच्या त्या सदस्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात सांगोला तालुक्यासह जिल्ह्यात विकासाची अनेक कामे झाली. आजही त्या आपले बंधू दीपकआबा यांच्या सोबतीने जनसेवेचे व्रत हाती घेऊन कार्यरत आहेत.


सांगोला तालुक्यात ॲड. शहाजीबापू पाटील, प्रा. पी.सी. झपके, श्रीकांत देशमुख यांनी कॉंगेस पक्षाला बळकटी दिली.


श्रीकांत देशमुख

श्रीकांत अप्पासाहेब देशमुख हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते. त्यांनी दीर्घकाळ काँग्रेसचे काम केले. मात्र अलीकडील काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सांगोला तालुक्यात भाजपला ताकद दिली आहे. त्यांच्या रूपाने कधी नव्हे ते चैतन्य आले आहे. देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. तरुण वर्गात त्यांची क्रेझ आहे. श्रीकांत देशमुख हे हाडाचे पैलवान. 


त्यांना कुस्तीचा मोठा शौक आहे. त्यांनी जवळा गावात अनेक वर्षे जागतिक पातळीवरील कुस्त्यांची मैदाने भरविली आहेत. त्यांना त्यांचे वडील कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त अप्पासाहेब देशमुख, बंधू तथा माजी पोलीस अधिकारी शशिकांत देशमुख, लालासाहेब देशमुख यांची खंबीर साथ मिळत आहे. बंधू शशिकांत देशमुख हे सुध्दा भाजपमध्ये राज्य पातळीवरील नेते असल्याने श्रीकांत देशमुख यांची मोठी ताकद निर्माण होत आहे.


कै. सीताराम वाघमोडे

यापूर्वी तालुक्यात जवळा गावचे सुपुत्र सीताराम वाघमोडे यांची गांधी घराण्याशी असलेली जवळीकता त्यांना राज्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नेवून बसविण्याची ठरली.


डॉ. बाबासाहेब व डॉ. अनिकेत देशमुख

सध्या तालुक्यात स्व.गणपतआबा यांच्या पश्चात त्यांचे दोन नातूही राजकारणात सक्रिय झाले,असून डॉ.बाबासाहेब व डॉ.अनिकेत देशमुख हे दोघे बंधू तालुक्यात रान उठवीत आहेत. या दोघांनाही मानणारा मोठा वर्ग तालुक्यात तयार होत आहे. कै. आ. गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र चंद्रकांत देशमुख हेही सांगोल्यात शेकापचा किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी धडपडताना दिसतात.


याशिवाय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक तथा युवा नेते जगदीश बाबर, वॉटर आर्मीचे प्रमुख तथा जल अभ्यासक प्रफुल्ल कदम, सांगोल्याच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष राणीताई आनंदा माने, कार्यसम्राट नगरसेवक आनंदा माने, जिल्हा परिषद सदस्य तथा विकासकामांचा डोंगर उभा करणारे अतुल पवार, 


जवळा जिल्हा परिषद गटात अलीकडील काळात प्रचंड कामे करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रीम. स्वातीताई कांबळे व त्यांचे बंधू तथा युवा नेते गणेश कांबळे, जवळा गावचे दीर्घकाळ सरपंच राहिलेले तथा माजी सभापती साहेबराव पाटील, जवळ्याचे नेते अरूणभाऊ घुले, शेकापचे युवक नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख, माजी जि. प.सदस्य प्रा. किसन माने, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रभावी तरुण नेते सोमा (आबा) मोटे, 


घेरडीचे तरुण नेते जयंत डोंगरे, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, माजी जि. प.सदस्य संगमआप्पा धांडोरे व माजी सभापती संगीता धांडोरे, माजी सभापती अनिल मोटे, संभाजी आलदर, घेरडीच्या सरपंच सुरेखाताई पुकळे, युवा नेते पिंटू पुकळे, शेकाप नेते बाबासाहेब करांडे, मारूतीआबा बनकर, सूत गिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार अशी कितीतरी नेते मंडळी आहेत. या सर्वांनी आपापल्या परीने तालुक्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे.


राजकिय सौहार्द

सांगोल्याच्या राजकारणात नेहमी दिसणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकिय सौहार्द. विविध पक्षांत असूनही या नेत्यांमध्ये राजकिय सौहार्द दिसून येते. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने हे नेते अनेकदा एकत्र येताना दिसतात. आणि हेच वर्तन तालुक्याच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचे उदाहरण म्हणून पुरेसे आहे.

Post a Comment

0 Comments