Breaking News

सोलापूर -सांगोला तालुक्यातील, “उदनवाडी गावात अनेकांचा शेकापक्षामध्ये जाहीर प्रवेशामूळे शिवसेनेसह विरोधी पक्षात खळबळ”..

 सोलापूर -सांगोला तालुक्यातील, “उदनवाडी गावात अनेकांचा शेकापक्षामध्ये जाहीर प्रवेशामूळे शिवसेनेसह विरोधी पक्षात खळबळ”.. 

प्राप्त बातमीनुसार सद्या येणाऱ्या पंचायत समिती ,जिल्हा परिषद निवडणुका आणि  जनसेवा व्रत ,दिवंगत जागतिक लोकप्रिय रेकॉर्ड आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्यानंतर सम्पूर्ण जबाबदारी त्यांचे वंशज यांनी जनसेवेचा वसा सार्थपणे उचलला आहे यानुसार..


याच कार्यातून प्रेरित होऊन वेळोवेळी जनसामान्य जनतेत हक्काने धावून जाणारे दोन डॉक्टर भाई बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख आणि मार्गदर्शन चंद्रकात दादा यांनी

जन -सेवा, संवादाचं नात यशस्वी पेललं असून


यातूनच काल सांगोले तालुक्यातील उदनवाडी ते कारंडेवाडीतील प्रमुख शिवसेना विरोधी पक्षातील नेत्यांचा,कार्यकर्ते.. आज शेतकरी कामगार पक्षांमध्ये ‌जाहीर प्रवेश झाला आहे


दिवंगत आबासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवत आसलेले‌ युवा नेतृत्व डॉ बाबासाहेब देशमुख यांच्यावरती विश्वास ठेवत ऊदनवाडी गावातील कारंडे वाडीतील श्री उत्तम विठोबा ठोंबरे,मेजर शिवाजी मलका शेळके,संजय शंकर शेळके, सिद्राम गौडापा बिराजदार व बापुसाहेब दामोदर चव्हाण या नेत्यांनी शिवसेनेला ‌सोडचिठ्ठी देत पुरोगामी युवक‌ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ ‌बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार‌ पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.


यावेळी प्रवेश ‌केलेले उत्तम विठोबा ठोंबरे, म्हणाले मी आयुष्यभर एस‌ टि कर्मचारी म्हणून जनतेची सेवा केली व आता निवृत्तीनंतर डॉ बाबासाहेब ‌देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व शेकापक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे ठरवले‌ आहे.


डॉ बाबासाहेब ‌देशमुख बोलताना म्हणाले की,आज ज्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिवंगत आबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शेतकरी कामगार‌‌ पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे स्वागत ‌करतो‌ व त्यांना शेतकरी कामगार पक्षांमध्ये सन्मानाची वागणुक दिली जाईल व त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल .यावेळी सर्वाचा स्वागत-सत्कार करण्यात येऊन


शेतकरी कामगार पक्ष हा सामान्य जनतेच्या प्रश्नांनासाठी काम करीत आलेला पक्ष आहे शेतकरी, कष्टकरी,कामगार,दलीत व महिला यांच्या न्याय प्रश्नांनासाठी लढण्याची परंपरा शेकापक्षाची आहे,दिवंगत आबासाहेबांनी घालुन दिलेले विचार‌ आचार व‌ शिकवण ह्या जोरावरती येणार्या काळात ‌शेकापक्षाची पाळेमुळे ‌खोलवर रुजवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया व‌ सर्व प्रवेश केलेल्या ‌नेतेमंडळीचे पुनश्च स्वागत करुन‌ त्यांनी‌ आपले मनोगत व्यक्त केले.


सदर कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य दिगंबर शिंगाडे,बालेखान शेख,राम ढोणे आपा,बापु दादा चौगुले, दत्तात्रय ‌बंदवडे,लक्ष्मण मारकड,संतोष ठोंबरे, पांडुरंग बंदवडे, सिध्देश्वर शेळके, प्रभु शेळके, तुकाराम मारकड,हरी (नाना)वलेकर, विश्वास केंगार,तानाजी वलेकर,संतोष चौगुले,नाथा केंगार,भानुदास ठोंबरे, हर्षद ठोंबरे,गणूश ठोंबरे,दिगंबर लवटे,आबासाहेब आलदर, लक्ष्मण ठोंबरे इत्यादी नेते‌ कार्यकर्ते,पदाधिकारी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेची माहीती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत ‌सरतापे यांनी दिली

Post a Comment

0 Comments