google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात काळ्या सोन्याच्या अवैद्य व्यवसायाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Breaking News

सांगोला तालुक्यात काळ्या सोन्याच्या अवैद्य व्यवसायाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

 सांगोला तालुक्यात काळ्या सोन्याच्या अवैद्य व्यवसायाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सांगोला: आपले अवैद्य काम लक्षात येऊ नये यासाठी कोण, कशी शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. सांगोला शहरात अवैद्य आणलेली वाळू बांधकामाच्या ठिकाणी जाऊन खाली करण्यासाठी चक्क त्या भागातील विजेचा ट्रांसफार्मर बंद केला जातो. त्यामुळे अवैद्यरित्या आणलेल्या वाळूला ओतण्यासाठी आपली गाडी दिसू नये यासाठी विजेला घालवण्याची शक्कल वाळू चोर सध्या शहरात करीत आहेत. 


याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. ते येतात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाळू ओततात व निघून जातात. त्यामुळे सांगोला तालुक्यात 'वाळू चोरी जोमात, प्रशासन मात्र कोमात' असल्याने काळ्या सोन्याच्या अवैद्य व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे.


सांगोला तालुक्यातुन मान, अप्रुफा, बेलवण, कोरडा अशा नद्या जातात. या. नदीकाठच्या परिसरातून अवैद्य वाळू उपसा करून बांधकामाच्या ठिकाणी पोहोच करण्याची एक मोठी साखळीच दररोज या कामात व्यस्त असताना दिसून येते. मध्यरात्रीपासून पहाटेच्या सुमारापर्यंत ठराविक ठिकाणाहून वाळू बांधकामापर्यंत पोहोच करण्याची वाहने वेगाने व राजरोसपणे तालुक्यात सुरू आहे. अवैद्य वाळू उपशामुळे नदीमध्ये अनेक ठिकाणी खड्डेही पडलेले दिसून येतात.


या अवैद्य वाळू उपशावर लक्ष देणे गरजेचे असताना साध्या कर्मचाऱ्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. कारवाई संदर्भात छोटी मोठी कारवाईची प्रकरणे सोडली तर याकडे अर्थपूर्ण व्यवहारच कारणीभूत आहे की काय अशी शंका सर्वसामान्यांना होत असते. या अवैध वाळू उपसा शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनाबरोबरच सामान्य नागरिकांनीही जागृत राहणे गरजेचे आहे.


सुंदर कार्यालयाबरोबरच लोकप्रिय प्रशासन हवे -

सध्या संपूर्ण जिल्ह्यात महसूल विभागाचे 'सुंदर माझे कार्यालय' हे अभियान सुरू आहे. कार्यालय सुंदर होणे ही काळाची गरजच आहे, परंतु त्याचबरोबर कार्यालयातील प्रशासनही जनसामान्यांसाठी लोकप्रिय झाले पाहिजे. नुसते सुंदर कार्यालय असून फायदा होणार नाही तर प्रशासनही लोकप्रिय होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.


दिवसा कारवाई, रात्री ढिलाई -

सध्या मार्च एंडमुळे अनेक रस्त्यांवर वाहतुक पोलीस कारवाई करताना दिसुन येत आहेत. दिवसा साध्या मोटरसायकल पासून इतर अनेक वाहनांवर वाहतुकीचे नियम दाखवणारे पोलीस, मात्र रात्रीच्या वेळी बिगर नंबर प्लेटवाल्या गाड्या वेगाने जात असताना याकडे दुर्लक्ष करीत असतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे पहाटेच्या वेळी रस्त्यांवरून व्यायामासाठी फिरणारे अनेक नागरिकही अपघातामुळे फिरण्याचे बंद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची 'दिवसा कारवाई व रात्री ढिलाई' असे चित्र सध्या दिसून येत आहे.


काळ्या सोन्याने वाढली मुजोरी -

या नद्यांचा पात्रांतुन 'काळ्या सोन्याने' अनेकांची ईच्छापुर्ती होत आहे. अल्पकालावधीत कमी श्रमात मोठी माया गोळा करण्याचा व्यवसाय म्हणून वाळू व्यवसायाकडे सध्या पाहिले जात आहे.


 या व्यवसायात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे या व्यवसायामुळे तरुणाईमध्ये मुजोरी वाढली असून अनेक वेळा भांडण-तंटेही होतात. आधिकाऱ्यांनी कारवाई केलेल्या वाहनांना पळवून नेण्याबरोबरच कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे, त्यांच्यासमोरुन गाड्या पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे एकंदरीत काळ या सोन्याच्या वैद्य वाहतुकीमुळे तालुक्यात मुजोरी वाढल्याचे दिसून येते. याला वेळीच आवर घालनणे महत्वाचे आहे.

Post a Comment

0 Comments