राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनाच मागितली पाच कोटींची खंडणी !
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाच धमकी देत पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी एक महिलेवर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक हे एका महिलेच्या तक्रारीवरून अडचणीत आलेले असताना आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना इंदूरच्या एका महिलेने धनंजय मुंडे यांना बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण समोर आले आहे. पाच कोटी रुपयांची खंडणी नाही दिली तर बलात्कार केल्याची तक्रार करीन अशी धमकी या महिलेने धनंजय मुंडे यांना दिली अशा हा गुन्हा आहे. खंडणी मागणारी आणि बलात्काराची धमकी देणारी ही महिला इंदूर येथील आहे. या महिलेने मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी बलात्काराची तक्रार केली होती पण त्यानंतर या महिलेने आपली तक्रार मागे घेतली होती.
ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान आंतरराष्टीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन आला आणि या महिलेने धनंजय मुंडे यांना बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी दिली आणि त्यासाठी पाच कोटींची खंडणी मागितली. पाच कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल देण्यात यावा असा तगडा या महिलेने मुंडे यांच्याकडे लावला आणि नाही दिले तर बलात्कार केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देवू असे सांगितले शिवाय सोशल मीडियावर देखील बदनामी करण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
करुणा शर्मा प्रकरण !
करुणा शर्मा प्रकरण अलीकडेच राज्यभर चर्चेचे ठरले होते. माध्यमांच्या समोर देखील शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. या प्रकरणाने मुंडे यांची डोकेदुखी वाढलेली होती, त्यानंतर खंडणीचे प्रकरण समोर आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


0 Comments