google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीला डावलून कार्यक्रम घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी वरिष्ठांकडे करणार तक्रार : हरिभाऊ पाटील

Breaking News

काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीला डावलून कार्यक्रम घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी वरिष्ठांकडे करणार तक्रार : हरिभाऊ पाटील

 काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीला डावलून कार्यक्रम घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी वरिष्ठांकडे करणार तक्रार : हरिभाऊ पाटील

सांगोला / प्रतिनिधी : राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी सांगोला तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना काँग्रेस पक्षाचा आणी पक्षाच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांचा विसर पडला आहे .


 यामध्ये तालुक्याच्या खरीप हंगाम नियोजनार्थ झालेल्या बैठकीत व ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य मेळाव्यादरम्यान काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींना व कार्यकर्त्यांना आमंत्रित केले नाही . यामुळे संबंधित कृषी अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी दिला आहे .


सांगोला तालुक्यात विविध शासकीय निमशासकीय कार्यक्रम होत असताना , काँग्रेस पक्षाची बाजू आणि भूमिका तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वकांक्षी ठरली आहे . आजपर्यंतच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाने तळागाळातील सर्वसामान्य नागरिक , शेतकरी , वंचित घटक यांचा विचार करून त्यांना कायम न्याय देण्याची भूमिका घेतली आहे .


 शासनाच्या योजनेपासून पात्र लाभार्थ्यांना वगळले असता काँग्रेस पक्षाने बेजबाबदार अधिकान्यांना कायम धारेवर धरले आहे . परंतू आज आघाडीमध्ये असताना काँग्रेस पक्षाला जमेत धरले जात नाही . प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काँग्रेसच्यापक्षनेत्यांसह पक्षाच्या तालुका अध्यक्ष यांना देखील डावलण्यात येत आहे . यामुळे आघाडी केवळ राज्यापुरतीच मर्यादित आहे का ? 


असा सवाल करीत , महाविकास आघाडी मधील काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळी ला डावलून कार्यक्रम घेणाऱ्या संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना याचा जाब विचारणार असून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी दिला आहे .

Post a Comment

0 Comments