जाड असल्यावरून हिणावले तरुणीने लग्नाच्या आधीच गळफास घेऊन संपवले जीवन ,
लग्नाआधीच हुंड्याचे दागिने व पैशांसाठी होणारा छळ, तसंच होणाऱ्या पतीनेच जाड म्हणून हिणवले आणि लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणीने बोहल्यावर चढण्याआधीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरी रवींद्र नागपुरे असं या उच्चशिक्षित तरुणीचे नाव आहे.
राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन तिने जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, होणारा पती व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहाचा ताबा न घेण्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. नंतर मात्र अंत्यसंस्कार करण्यात आले.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुऱ्हे पानाचे येथील रामेश्वरी नागपुरे हिचे रावेर येथील भूषण याच्याशी लग्न ठरले होते. ६ मार्च रोजी थाटामाटात साखरपुडा झाला होता तर १८ मे रोजी विवाहाचा मुहूर्त काढला होता. हुंडा म्हणून तीन तोळे सोने व ५० हजार रुपये रोख लग्नाच्या दिवशी देण्याचे ठरले होते. परंतु साखरपुडा होताच काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईकडून दागिने व पैशांचा तगादा सुरू झाला.
गेल्या 'आठवड्यात आम्ही जळगावात आलो आहोत, आम्हाला आजच दागिने व रोख रक्कम द्या 'म्हणून सांगितले. त्यासाठी रामेश्वरीचे कुटुंबीयांना रावेर येथे बोलावले. तेथे दागिने व रोख रक्कम दिली. (या अभिनेत्रीला ओळखलं का ?
आता आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आई) त्यानंतर दोन-तीन दिवसांत पुन्हा भूषणकडून रामेश्वरी हिला हिणवणे सुरू झाले. 'तू जाड आहेस, मला आवडत नाही. मामांनी सांगितले म्हणून होकार दिला पण मी हे लग्न मोडणार आहे. आता लग्न कुन्हे गावात नाही तर भुसावळात लॉनवर करायचे' असे सांगून दम देत होता.
भूषणचा त्रास सुरूच होता. अखेर त्याच्या छळाचा कंटाळून राजेस्वरीने आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नवऱ्या मुलाला आणि सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
तरुणीच्या कुटुंबीयांनी केली. तसंच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाी तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्राच कुटुंबीयांनी घेतला. मात्र भुसावळ तालुका पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


0 Comments