म्हैसाळ योजनेची कामे दर्जेदार करा, अन्यथा गाठ माझ्याशी
म्हैसाळ योजनेसाठी भाई गणपतराव देशमुख यांनी खूप संघर्ष केला आहे. या योजनेचे पाणी तालुक्याच्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. पाईपलाईनची कामे नित्कृष्ट करण्याची हिम्मत होतेच कशी? पाण्यासाठी कोणी अधिकारी मुद्दामहून आडकाठी आणत असेल तर माझ्याशी गाठ आहे. असा निर्वाणीचा इशारा डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
जलसंपदा विभागाचा कोट्यवधी रूपयाचा निधी पाण्यात घालणाऱ्या म्हैसाळच्या विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला व संबंधित ठेकेदाराला घरीच घालवणार असून, जाणूनबुजून शेतकऱ्यांना त्रास दर असाल तर, मला वेगळा पर्याय निवडावा लागेल.आता इथून पुढे तर चांगल्या दर्जाची कामे करा,अन्यधा माझ्याशी गाठ आहे, असे ठणकावून डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील सांगोला वितरिका क्रमांक एक व दोनच्या दर्जाहीन झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी काल सोमवार 28 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता भेट दिली.
त्यादरम्यान, परीस्थिती जाणून घेतली.यावेळी सांगोला तालुका खरेदी_ विक्री संघाचे संचालक तुकाराम भुसनर,पारेचे माजी सरपंच मधुकर गोरड, काकासाहेब करांडे, तुकाराम गोरड,बंडू वाघमोडे, संतोष करांडे,दादा भुसनर,सोपान करांडे,दादा करांडे,राजू गेजगे सर,दगडू करांडे,अर्जुन बुरंगे, म्हैसाळ योजनेचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.
प्रारंभी विस्कळीत झालेल्या सांगोला वितरीका क्रमांक एकची पाहणी केल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींची कल्पना आली. ही बंदिस्त पाईप लाईन करताना इंजिनियर नव्हते का? एका वर्षात काय काय कामे केली ? मग वर्षाच्या आतच केलेली कामे अशी दर्जाहीन का केलीत?
पाईप कोठून आणल्या? यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करीत,ठेकेदाराला व अधिकाऱ्यांना जाब विचारला. कामे करताना इंजिनियर झोपा काढीत होते का? हा तर शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय आहे.
आबासाहेबांनी सारे आयुष्य शेतकरी कष्टकरी जनतेसाठी घालविले.त्यामुळे तालुक्यात अश्या गोष्टीना खपवून घेतले जाणार नाही? भानावर येवून कामे करा? नाही तर एकेकाला घराचा रस्ताच दाखविला जाईल.
पाणी हा शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी दर्जाहीन कामे कराल,तर फसाल.याचदरम्यान यांना वितरीका क्रमांक एकलाच अनेक ठिकाणी दर्जाहीन कामांची प्रचिती आली.ही सर्व कामे येत्या आठ दिवसात मार्गी लावून,यातून तात्काळ पाणी सोडा?
मी हे पाणी पाहण्यासाठी पुन्हा येणार आहे.त्यात दरम्यान येथील उजनीकर-करांडे वस्तीवरील शेतकऱ्यानी आम्हाला या योजनेतून पाणीच मिळत नाही? असे सांगितले असता विस्तारित पाईपलाईन सर्व्हेमध्ये यांचा समावेश करून,त्यांना ही लवकरात लवकर पाणी द्या,असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
मी स्वतः जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याशी बोललो आहे. कोणीही हकाच्या पाण्यावाचून वंचित राहणार नाहीत,याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. याचवेळी सांगोला वितरिका क्रमांक दोन मधून गेजगे वस्तीवरील तलावही भरून द्यावा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
कनिष्ठ उपअभियंता गैरहजरसांगोला वितरिका क्रमांक एकची दर्जाहीन कामे करण्यास कनिष्ठ उपअभियंता सुहास पवार हाच जबाबदार आहे. ठेकेदाराच्या दिवाणजीला पाठवून कामे करीत आहे. त्यामुळे येथील कामे निकृष्ट झालेली आहेत. या सर्व बाबींची पाहणी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख हे आले होते.
त्याच दरम्यान कामे करून घेणारा इंजिनियर, तथा कनिष्ठ उपअभियंता सुहास पवार यांना माहीत असतानाही, हे अधिकारी मुद्दामहून गैरहजर राहिले होते. अशा या कामचुकार अधिकाऱ्यांच्या मी स्वतः चौकश्या लावणार असल्याचे, डॉ.देशमुख यांनी सांगितले.
पाण्यासाठीच जनसेवेत
स्व.आबासाहेबांनी आपल्या राजकारणातील उभे आयुष्य तालुक्यातील जनतेच्या पाणीप्रश्नासाठी घालविले. त्यामुळे तर सांगोला तालुक्यात हे पाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. याची वस्तूस्थिती केंद्रित रस्ते वाहतूकमंत्री ना.गडकरी साहेबांनी सांगितली आहे.
आत्ताही पाण्यासाठी कोणी अधिकारी मुद्दामहून आडकाठी आणत असेल तर माझ्याशी गाठ आहे. तालुक्यातील जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी द्या? कामे चांगली करा? मी तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे


0 Comments