google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदारांना मोफत घरे देण्यास शरद पवारांचा विरोध; सरकारला घरचा आहेर

Breaking News

आमदारांना मोफत घरे देण्यास शरद पवारांचा विरोध; सरकारला घरचा आहेर

 आमदारांना मोफत घरे देण्यास शरद पवारांचा विरोध; सरकारला घरचा आहेर 

 राज्यातील ठाकरे सरकारने आमदारांना मोफत घरे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काही जणांनी या निर्णयाचे स्वागत केलं तर काही आमदारांनी घरे घेण्यास नकार दिला. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरून नाराजी व्यत्क्त केली होती. त्यातच आता आमदारांना मोफत घरे देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच विरोध दर्शवत सरकारला घरचा आहेर दिला आहे


शरद पवार यांनी फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांना साठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन ही घरे दिली पाहिजेत, असं त्यांनी म्हटलंय. तसेच या निर्णयाबाबत शरद पवार पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


दरम्यान, आमदारांना मोफत घरे देण्यावरून यापूर्वीही सत्ताधारी आणि महाविकास आघाडी मध्ये वाद झाला होता, त्यानंतर आमदारांना घरे मोफत मिळणार नाहीत तर त्यांना त्यासाठी किंमत मोजावी लागेल असेच स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले होते. तर दुसरीकडे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मात्र हि घरे नाकारली होती. त्यांच्या या कृतीचे सर्वानी स्वागत केलं होत

Post a Comment

0 Comments