google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोलेकरांनो लग्न जमवताय? सावधान!

Breaking News

सांगोलेकरांनो लग्न जमवताय? सावधान!

 सांगोलेकरांनो लग्न जमवताय? सावधान! 

सांगोला तालुक्यातील तरुणांनो तुम्ही अनोळखी व्यक्तीसोबत लग्न जमवताय? सावधान! कारण तुम्हाला फसविले जावू शकते. अहो हे अगदी खरंय. आपल्या तालुक्यातील कडलासच्या तरुणाला सोलापूरच्या भामट्यांकडून गंडा घातला गेलाय. नेमकं प्रकरण काय आहे ते वाचाच.


सांगोला तालुक्यातील कडलास तसेच सातारा येथील कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सोलापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, विजयपुर येथील दोन जनाचे टोळके जेरबंद केले आहे. याच भन्नाट घटनेचा संभाजी ब्रिगेटचे सांगोला तालुका अध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी भांडाफोड केला.


सोलापुरातील संतोष पवार नावाच्या व्यक्तीने आमच्या मुलीचा विवाह करायचा असून,आमचा संसार पुरत वाहून गेल्यामुळे कोणतीच कागदपत्रे नाहीत. आमचे कोणीच पाहुणे देखील नाहीत,असे कडलास येथील जाधव कुटुंबीयांना सांगितले. तसेच आम्ही गरीब असून विवाहाच्या तयारीसाठी दीड लाख रुपये द्या अशी मागणी केली. त्यावेळी जाधव कुटुंबीयांनी 80 हजार रुपये रोख दिले. मुलगी बघायला आल्यावर गडबडीत साखरपुडा उरकला. त्यानंतर 16 मार्च रोजी लग्न करावयाचे ठरले.


त्यामुळे विवाहाच्या एक दिवस अगोदर नवरीला आनावयास मुलाचे आजोबा सोलापूरला आले. त्याच दरम्यान मुलाच्या आजोबांकडून सोन घेवून संतोष काशिनाथ गवंडी व भारती चंद्रकांत पवार दोघेही राहणार धुटर्गी तांडा, विजयपुर हे दोघे पळून गेले.


याबाबतची माहिती समजल्यानंतर सांगोला येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रदीप मिसाळ-पाटील यांनी ही बाब सोलापूर शहाराध्यक्ष शाम कदम, गजानंद शिंदे,अरविंद शेळके, मल्लू भंदारे यांना दिली. त्यानंतर जाधव यांनी फौजदार चावडी पोलिसात धाव घेतली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी त्या आरोपीचे मोबाईल लोकेशन शोधून काढून,त्यांनी व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांनी अशीच फसवणूक सातारा येथील कुटुंबीयांचीही केली होती.


सांगोला तालुक्यातील कडलास या गावातील एका कुटुंबास लग्नाचे आमिष दाखवून पैसे व सोने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश फौजदार चावडी पोलिस स्टेशनच्या वतीने अवघ्या काही तासातच करण्यात आला.


सदर टोळीतील आरोपीला ताब्यात घेऊन रोख 80 हजार रुपये व दोन तोळे सोने ऐवज हस्तगत करण्यात आले. कडलास गावातील जाधव कुटुंबबियांची सोलापुरातील संतोष पवार नावाच्या व्यक्तीने आमची मुलगी आहे लग्नासाठी सोयरीक जमवा, आमचा संसार पुरामध्ये वाहून गेल्यामुळे आमच्याकडे कोणतीच कागदपत्र नाहीत व आमचे कोणी पाहुणे नाहीत असे सांगून आम्ही गरीब आहोत आम्हाला लग्नासाठी दीड लाख रुपये द्या अशी मागणी केली असता जाधव कुटुंबीयांनी त्यांना 80 हजार रुपये रोख दिले.


मुलगी बघायला आल्यावर गडबडीत साखरपुडा सुद्धा उरकून घेतला तसेच दिनांक 16 मार्च 2022 ला लग्न करण्याचे ठरले होते त्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी वधु मुलीला घेण्यासाठी वराच्या आजोबांना सोलापूरला येण्याचे कळवले, तसेच येताना मुलीचे सोने सुद्धा घेऊन या असे सांगितले असता दोन तोळे सोने घेऊन स्टैंड वर या तिथून मुलीला घेऊन आपण गावाकडे जाऊ असे आरोपी संतोष पवार याने सांगितले, वराचे आजोबा – मनोहर जाधव एसटी स्टँडवर आले.


आरोपी संतोष पवार (गवंडी) याने त्यांना गाडीवर हिराचंद नेमचंद वाचनालय जवळ घेऊन आले, आरोपी सोबत दोन महिला होता त्या महिला म्हणाल्या आम्ही मुलीला बांगड्या घेण्यासाठी नवी पेठ कडे आलो आहोत ते सोने दाखवा आम्ही आमची अपंग (नातलग) तिला दाखवून येतो असे म्हणून सोने घेऊन त्या पसार झाल्या.


काही वेळाने आरोपी संतोष पवार याने पण मी लगेच जाऊन येतो म्हणून तिथून तो पसार झाला चार वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली, त्यानंतर आरोपीकडून कसलाही संपर्क झाला नाही त्यामुळे वराच्या आजोबांनी आपल्या गावाकडे फोन करून आपल्या मुलाला-सुनेला व नातवाला बोलून घेतले, वर-पक्षास आपली फसवणूक झाल्याची कल्पना येताच त्यांनी त्यांच्या ओळखीचे संभाजी ब्रिगेडचे (सांगोला) तालुका अध्यक्ष प्रदीप मिसाळ यांना ही गोष्ट कानावर घातली.


त्यांनी लगेच सोलापूर येथील संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांना संबंधित घटना सांगून त्या जाधव कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली असता तात्काळ संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष गजानंद शिंदे, संघटक मल्लू भंडारे यांनी संबंधित कुटुंबाची सोलापूर भेट घेऊन त्या आरोपीविरूद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद देण्यास सांगितले.


फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उदयसिंह पाटील साहेब यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला त्यांनी तात्काळ त्या आरोपीचा मोबाईल ट्रॅक् करायला सांगितला आणि तशा सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्याअसता संबंधित आरोपीचा मोबाईल लोकेशन जुळे सोलापुरातील कल्याण नगर येथे दाखवत होता.


त्यामुळे पोलिसांनी त्या लोकेशन ट्रॅक करून आरोपीला पकडले तेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्नही केला असता संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने दोन तोळे सोने व काही रोख रक्कम पोलिसांकडे जमा केली आरोपीवर 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला.


काही तासातच या प्रकरणाचा छडा लावल्यामुळे फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील साहेब, अमोल खरटमल, सचिन कुलकर्णी, दिपक डोके, लक्ष्मण पवार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष शाम भैय्या कदम यांच्या हस्ते शाल-फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments