google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील शिक्षकांसाठी सर्वात मोठी बातमी, बदल्यांबाबत ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..

Breaking News

राज्यातील शिक्षकांसाठी सर्वात मोठी बातमी, बदल्यांबाबत ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..

 राज्यातील शिक्षकांसाठी सर्वात मोठी बातमी, बदल्यांबाबत ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..

शिक्षकांच्या बदल्या.. म्हणजे दरवर्षी ठरलेला गोंधळ.. त्यात मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी होत असल्याचे समोर आले आहे.. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. मात्र, आता राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी समोर येत असून, यंदा पारदर्शक वातावरणात या बदल्या होणार असल्याचे सांगण्यात येते..


राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी एक मोबाईल ‘ॲप’ विकसित केले जात आहे. त्याचा मसुदा तयार झाला असून, येत्या दोन आठवड्यांत ‘ॲप’चे काम पूर्ण होईल. मोबाईल, तसेच संगणकावरही हे ‘ॲप’ वापरता येईल. या ‘ॲप’च्या माध्यमातून येत्या मे महिन्यात ऑनलाइन पद्धतीने या बदल्या होणार आहेत.


शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेच्या ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात पाच ‘सीईओं’चा अभ्यासगट नेमला होता. या अभ्यास गटाने विविध राज्यांतील शिक्षक बदलीच्या प्रक्रियेचा अभ्यास केला. तसेच शिक्षक नेत्यांशी चर्चा करून ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्याची शिफारस केली होती.


दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा आदेश पुण्याचे ‘सीईओ’ आयुष प्रसाद व साताऱ्याचे ‘सीईओ’ विनय गौडा यांना दिला होता. त्यानुसार ‘ॲप’च्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर आयुष प्रसाद यांनी माध्यमांना ‘ॲप’बाबत माहिती दिली.


‘ॲप’चा असा होणार फायदा..

मोबाइल ॲपवरून बदली प्रक्रिया होणार असल्याने हजारो शिक्षकांचा डोकेदुखी संपणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच सोप्या पद्धतीने अर्ज करावा लागेल. विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी, या ॲपवरच पाहता येणार आहे. या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.


पहिल्या संवर्गाच्या बदल्या झाल्यानंतर पुढील संवर्गाच्या बदल्या टप्प्याटप्प्याने केल्या जाणार आहेत. या बदलीची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शक असणार आहे. प्रत्येक शिक्षकाला आपल्या मोबाइलवरच बदली प्रक्रियेची माहिती मिळणार असल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे..

Post a Comment

0 Comments