google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसील कार्यालयाचा बदलला चेहरामोहरा ; कार्यालय झाले सुसज ; अभिजीत पाटील

Breaking News

सांगोला तहसील कार्यालयाचा बदलला चेहरामोहरा ; कार्यालय झाले सुसज ; अभिजीत पाटील

 सांगोला तहसील कार्यालयाचा बदलला चेहरामोहरा ; कार्यालय झाले सुसज ; अभिजीत पाटील

सांगोला / प्रतिनिधी ; ब्रिटिश कालीन सांगोला तहसील कार्यालयाची पुनर्निर्मिती करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे . आम . शहाजीबापू पाटील यांच्या फंडातून आणी लोकसहभागातून जमा केलेल्या निधीच्या माध्यमातून सांगोला तहसील कार्यालयाची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे.


सुंदर माझे कार्यालय  या अभियानांतर्गत सर्वांनी प्रोत्साहन दिले त्यामुळे आज तहसील कार्यालयाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे . यामध्ये विविध गावातील तलाठी कार्यालय आणि मंडल अधिकारी कार्यालय यांनी देखील सुंदर माझे कार्यालयात सहभाग नोंदवला असून त्यांनीही कार्यालय पुनर्निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे . 


सुरूवातीपासूनच तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू केले होते . सांगोला तहसील कार्यालय हे ब्रिटिश कालीन वास्तु होती . पावसाळ्यामध्ये तहसील कार्यालयावरील कवले गळत होती . तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्थित खुर्ची व बाकडे नव्हती.परंतु आम.शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून तहसील कार्यालयाच्या पुनर्निर्मिती साठी ३३ लाख रुपये व लोक सहभागातून सांगोला तहसील कार्यालयाची पुनर्निर्मिती करून घेतली आहे . 


ब्रिटिश कालीन वास्तूची पुनर्निर्मिती करून तहसील कार्यालयावर पत्रे बसवून घेतले , तहसील कार्यालयामध्ये कामकरणाऱ्या अधिकाऱ्यांना वेगवेगळे कक्ष निर्माण करून घेतले आहेत . प्रत्येक अधिकाऱ्याला वेगवेगळे कपाट , वेगवेगळे टेबल देवून सांगोला तहसील कार्यालयामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .


चांगल्या वातावरणामध्ये बसून कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करू शकतात व नागरिकांना योग्य प्रकारे सेवा देऊ शकतात . गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये कोरोना महामारीच्या संकटामुळे सांगोला तहसील कार्यालयाची खूप कामे पेंडिंग राहिली होती . शनिवारी व रविवारी सुद्धा कर्मचाऱ्यांना बोलवून ऑफिसची जी पेंडिंग कामे राहिली होती ती पूर्ण करण्यात आली आहेत . तहसिल कार्यालयामध्ये येणारे सर्व अर्ज तयार झालेले आहेत . त्या अर्जावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार आहे . कार्यालयाच्या दुरुस्ती बरोबरच कार्यालयाची स्वच्छता , कार्यालयाचे कामकाज यावर अधिक लक्ष देण्यात आले आहे . येणाऱ्या अर्जावरती सांगोला तहसील कार्यालयामध्ये तात्काळ कारवाई करण्यात येते . 


कोणत्याही प्रकारची पेंडिंग कामे ठेवली जात नाहीत . तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालयाने देखील माझे कार्यालय सुंदर कार्यालय या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून तालुक्यामध्ये ६० तलाठी कार्यालय व १० मंडलाधिकारी कार्यरत असून नवीन ६ ठिकाणी लोकसहभागातून तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे . सर्व तलाठी कार्यालयांना एकसारखा रंग देण्यात आला आहे , एक सारखे बोर्ड लावण्यात आले आहेत , एकसारखे नकाशे लावण्यात आले आहेत . तलाठी कार्यालयाचे दप्तर अद्यावत करण्यात आले आहे . सातबारा असो किंवा ईपीक पाणी असो सर्व प्रकारची कामे मार्गे लावण्यात आली आहेत .


 जेणेकरून तालुक्यातील तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालय सुंदर आणि कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . असे ही तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे .

Post a Comment

0 Comments