google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग !

Breaking News

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग !

 अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग !

मंगळवेढा : शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी  मंगळवेढा येथील नऊ जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मंगळवेढा येथील एका सोळा वर्षे वयाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मागील दीड वर्षांपासून या पिडीत मुलीला त्रास दिला जात होता. सदर मुलगी शाळेतून आपल्या घरी निघाली असता तिचा पाठलाग करून तिचा पाठलाग करून, तिचा हात वाईट हेतूने पकडून पिडीत मुलीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याबाबत तक्रार देण्यात आली आहे. पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असूनही मंगळवेढा शहरात तसेच माचणूर येथे काही जननी संगनमत करून हे कृत्य केल्याचे फिर्यादीत   म्हटले आहे. 


या प्रकरणातील आरोपी राहुल शिंदे याच्यासोबत पळून जा यासाठी दमदाटी  करून राहुल शिंदे याने त्याच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकीही या पिडीत मुलीला देण्यात आली तसेच राहुल शिंदे याची भेट घेण्यासाठी पिडीतेला प्रवृत्त करण्यात आल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले असून या घटनेत दोन मुलीही आरोपी आहेत हे विशेष मानले जात आहे. सदर प्रकरणी राहुल शिंदे, सागर कोळी, प्रतिक रणदिवे, अविराज रणदिवे, निहाल शेख, अमोल घोडके, किशोर जगताप, दिपाली शिंदे आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान कलम ३५४, ३५४ अ, ३५४ ड, ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ आणि १७ नुसार हा गुन्हा दाखल  झाला आहे.

Post a Comment

0 Comments