डिजिटल सदस्य नोंदणी करणाऱ्यांना मिळणार काँग्रेसचे तिकीट- मंत्री अमित देशमुख
महीलांनी नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन, आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्धार, शिबिराला अनुपस्थित राहणाऱ्या जिल्हाध्यक्षांवर होणार कार्यवाई, काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी विक्रमी सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन
देशात जनतेला खुशहाली प्राप्त करुन देण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. 31 मार्च पर्यंत काँग्रेसची डिजिटल सदस्य नोंदणी सुरु आहे. आगामी निवडणुकीत तिकीट मिळवायचे असेल तर कार्यकर्त्यांना डिजिटल नोंदणी आवश्यक आहे. काम करणाऱ्यांचाच विचार पक्ष संघटन करणार आहे. देशात काँग्रेस शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडी करने अशक्य आहे. आगामी निवडणूका प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आदेशानुसार स्वबळावर लढले जातील यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.
आमदार, खासदार, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्ष बळकट करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली थेट संवाद साधण्यासाठी डिजिटल सदस्य नोंदणी राज्यात विक्रमी करावी. देशात महाराष्ट्राचा पहीला नंबर यायला हवा. काम करणाऱ्यांना पक्ष संधी देणार आहे. 31 मार्च नंतर पक्ष संघटनेच्या निवडणुकीसाठी हि नोंदणी असली तरीही सदस्य नोंदणी सुरु राहावी. मराठवाडा शिबिरात अनुपस्थित राहणाऱ्या जिल्हाध्यक्षांवर कारणे दाखवा नोटीस पाठवावी.
कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने परिस्थिती हाताळली. आरोग्य सुविधा बळकट केल्याने अनेकांचे जीव वाचले. भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे राज्याला विकासाकडे नेत आहे. असे प्रतिपादन आपल्या भाषणात मराठवाडा डिजिटल सदस्य नोंदणी अभियान शिबिरात वैद्यकीय शिक्षण तथा संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी केले.
त्यांनी काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी कशी कसरत करावी लागते याचा आपला अनुभव सांगितला.
शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरातील सागर रिसॉर्ट येथे काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणीसाठी आढावा घेण्यासाठी मराठवाड्याचे शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
व्यासपीठावर डिजिटल नोंदणी अभियानाचे पिआरओ, मा.केंद्रीय मंत्री पल्लम राजू, आमदार प्रणिती शिंदे, सोशलमिडीया प्रदेशाध्यक्ष विलास मुत्तेमवार, आ.शिरीष चौधरी, आ.सुरेश वरपुडकर, रामकृष्ण ओझा, भाई नगराळे, राहुल साळवे, विलास औताडे, एम.एम.शेख, निरीक्षक एड मुजाहिद खान, प्रकाश मुगदीया, सत्संग मुंडे, राजुभय्या देशमुख, अमर राजुरकर, राजेश देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे,
अनिल पटेल, नामदेव पवार, इब्राहिम पठाण, खालेद पठाण, एड सय्यद अक्रम, विशाल बन्सवाल, डॉ. अरुण सिरसाट, संजय पगारे, डॉ. शादाब, हामद चाऊस, योगेश मसलगे, इकबालसिंग गिल, दिपाली मिसाळ, संदीप जाधव, शेख अथर, भाऊसाहेब जगताप, महीला जिल्हाध्यक्ष हेमा पाटील, महिला शहराध्यक्ष अंजली वडजे पाटील, सय्यद हमिद, आलम नुरखान, विशाल सानप, नदीम इनामदार, आदी उपस्थित होते. प्रस्तावना शहर जिल्हाध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी केली.
पल्लम राजु यांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यकर्ते व सामान्य जनतेला काँग्रेस सोबत जोडले जात आहे. काँग्रेसचे विचार घरात पोहचवायचे आहे. डिजिटल नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. युवकांना भविष्यात राजकारणात संधी द्यायची आहे. केंद्रातील भाजपा सरकारवर त्यांनी टिका केली. आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले सदस्य नोंदणी अभियानात कार्यकर्त्यांचे कामाचे मुल्यमापन होणार आहे.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी गावागावात व वार्डा वार्डात जावून जनतेशी संवाद साधत सदस्य नोंदणी करण्यासाठी अभियान यशस्वी करावे. डिजिटल नोंदणी मोहीमेचे राज्य समन्वयक भाई नगराळे यांनी डिजिटल सदस्य नोंदणी मोहीमेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले राज्यात आतापर्यंत फक्त एक लाख सदस्य नोंदणी झाली ती एक कोटीपर्यंत नेण्याचे टार्गेट आहे.
नोदणी मोहीम देशात ऑक्टोबर 2021 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने सुरु केले. 31 मार्च 2022 पर्यंत सदस्य बनवता येतील. यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रीया सुरु होईल. सप्टेंबर व ऑक्टोबर महीन्यात हे सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सहभागी होतील. सोशलमिडीया प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात संत गतीने सदस्य नोंदणी होत असल्याने नाराजी व्यक्त केली.
त्यांनी सांगितले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व खा.राहुल गांधी आणि वरिष्ठ नेते यांच्या सोबत डिजिटल माध्यमातून थेट संवाद साधला जाणार आहे. आपल्या अडीअडचणी आपण मांडू शकतात. तांत्रिक बिघाड नोंदणी मोहिमेत येत असेल तर सुधारणा केली जाईल. प्रत्येक विधानसभा, गट-गण, वार्डात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रामकृष्ण ओझा यांनी केंद्रातील भाजपा सरकारकडून कसे राजकारण सुरु आहे.
ईडीच्या कार्यवाईवर निशाना साधला. देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी काँग्रेसच पर्याय आहे. विविध राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपयश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे काँग्रेसला बळकट करण्यासाठी सदस्य नोंदणी यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले

0 Comments