गणपतआबा दिल्लीत आले अन् सोलापूरचा दुष्काळ हटला
सांगोल्यात सुरू असलेल्या पाण्याच्या श्रेयवादाला मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीत केलेल्या विधानावरून चांगलीच चपराक बसलीय. आगामी काळात सांगोल्यातील “कॉकटेल” राजकारणात “पाण्याची मात्रा” वाढवावी लागणार, हे मात्र नक्की आहे.
देशाच्या राजकारणातील भीष्म पितामह असणारे सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख हेच खरे दुष्काळी भागातील जनतेचे पाणीदार नेते होवून गेले. ते आज आपल्यात नाहीत, पण दिल्लीत आले अन् पाण्यासाठी निधीच घेवून गेले. त्यांच्यामुळेच सांगोला भागातील विविध पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीतील सभेत केले.
ना. नितीन गडकरी हे अनेक काळ केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात भाई गणपतराव देशमुख यांनी अनेकदा त्यांची दिल्लीत भेट घेवून सांगोला व आजूबाजूच्या दुष्काळी तालुक्यांसाठी पाणी मिळावे यासाठी अविरत संघर्ष केला होता.
टेंभू- म्हैसाळ योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्यात आणण्यात भाई गणपतराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. मात्र सध्या सांगोला तालुक्यात पाण्यावरून श्रेयाचे राजकारण रंगले आहे. त्याला ना. नितीन गडकरी यांच्या विधानामुळे चपराक बसली आहे. कारण ना. नितीन गडकरी हे अनेक काळ केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात भाई गणपतराव देशमुख यांनी अनेकदा त्यांची दिल्लीत भेट घेवून सांगोला व आजूबाजूच्या दुष्काळी तालुक्यांसाठी पाणी मिळावे यासाठी अविरत संघर्ष केला होता.
सांगली येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ) सांगली दौऱ्यावर होते. गडकरी यांचे सांगली शहरात 3 कार्यक्रम झाले. भिवघाट येथे ना. गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री गडकरी यांच्या हस्ते 2 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण झाले. सांगली ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील बोरगाव ते वाटंबरे दरम्यानच्या 52 किलोमीटर लांबीचा चौपदरीकरण रस्ता आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी, यावरील सांगोला ते सोनंद ते जत या मार्गाचा लोकार्पण सोहळा झाला. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते राजमती ग्राऊंड नेमिनाथनगर, सांगली येथे येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील, चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होते.
राहुल सोलापूरकरांनी घेतली मुलाखत
सांगलीतील खरे क्लब हाऊसमध्ये PNG सराफ पेढीच्या 190 व्या वर्धापन दिनानिमित्त नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखत अभिनेते राहुल सोलापूरकरांनी घेतली. देशातल्या विकासाच्या संदर्भात ही मुलाखत झाली.
अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सांगली यांच्या 350 बेड्सच्या अत्याधुनिक हॉस्पिटलचे लोकार्पण ना. गडकरी यांच्या हस्ते झाले.
गडकरींची शेतकरी मेळाव्याला भेट
ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सत्काराचा व शेतकरी मेळाव्याचा कार्यक्रम भिवघाट येथील विश्वचंद्र मंगल कार्यालय मध्ये पार पडला.
सांगली जिल्ह्याला रस्त्यांसाठी, ताकारी टेंभू म्हैसाळ तसेच रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण या कामासाठी मोठा निधी दिल्याबद्दल ना. नितीन गडकरी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व
भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला होता.
सांगोला तालुक्यांमध्ये पाण्याच्या श्रेयासाठी मोठे राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. माझ्याच कार्यकाळात या योजना मी आणल्या असे सांगत नेतेमंडळी भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात श्रेयवाद उभा करत आहेत.
भाई गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच निवडून दिले. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधीमंडळ सभागृहाने त्यांचा गौरव केला होता.
गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवर होते. १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केल्यावर आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. त्यावेळेस त्यांनी दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते.
पाण्यासाठी अविरत संघर्ष
भाई गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दुष्काळी भागामध्ये अनेक पाणी परिषदा घेतल्या. या पाणी परिषदांमध्ये भाई एन. डी. पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जयंत पाटील असे अनेक वरिष्ठ नेते सहभागी होते. या पाणी परिषदेचे फलित म्हणजे दुष्काळी भागातील अकरा तालुक्यांमध्ये आता प्रत्यक्षात पाणी पोचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाकडून अकरा वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करूणानिधी हे १० वेळेस विजयी झाले होते.
सांगोला तालुक्यांमध्ये पाण्याच्या श्रेयासाठी मोठे राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. माझ्याच कार्यकाळात या योजना मी आणल्या असे सांगत नेतेमंडळी भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात श्रेयवाद उभा करत आहेत.
श्रेयवादाला चांगलीच चपराक
मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीत केलेल्या या विधानावरून या श्रेयवादाला चांगलीच चपराक बसली आहे. भाई गणपतराव देशमुख यांचे सांगोला तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नासाठीचे काम कितीही प्रयत्न केले तर झाकून ठेवता येणार नाही, हेच जणू या वक्तव्यावरून सिद्ध झाले आहे. गडकरी यांनी केलेले हे विधान सांगोला तालुक्यातील अनेक शेकाप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर वायरल केले. अनेकांनी या विधानाचा आधार घेत सोशल मीडियावर भाई गणपतराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या.


0 Comments