सोलापूर : पळून जाऊन लग्न केल्याने तरुणाचे अपहरण, टेंभुर्णी पोलिसांकडून तरुणांची सुटका 8 जण ताब्यात
सोलापूर : मुलीने पळून जाऊन लग्न केले म्हणून मुलीच्या घरच्यांनी मुलाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. टेभुर्णी पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी अपहृत तरुणाची सुटका केली आहे.
याप्रकरणीअटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तरुणाची सुटका करुन त्याला हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मुलीच्या घरच्यांनी पीडित तरुणाचे हैदराबाद येथून अपहरण केले होते.
राजस्थान येथील तरुणाने पळून जाऊन लग्न केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी हैद्राबाद येथून एका तरुणाचे अपहरण केले होते. त्याला पुणे येथून घेऊन निघाले होते. टेभुर्णी पोलिस व महामार्ग पोलिसांच्या मदतीने अपहरणकर्त्यांना ताब्यात घेऊन त्या तरुणाची सुटका करण्यात आली. त्यास हैद्राबाद पोलिसांकडे स्वाधिन केले आहे. 26 फेब्रुवारी रोजी सोलापूर पुणे महामार्गावरील माढा तालुक्यातील वरवडे टोलनाक्यावर ही घटना उघडकीस आली. अपहरण केलेल्या 8 जणांवर टेभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये एका महिलेसह सात जणांचा समावेश असून या 8 जणांना 26 च्या रात्री उशिरा हैद्राबाद पोलिसांनी टेभुर्णीत येऊन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
राजस्थान येथील रामनिवास याने संशयित आरोपीच्या नात्यातील एका मुलीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघेही हैद्राबाद येथे वास्तव्यास होते. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी हैद्राबाद येथे जाऊन मुलीशी लग्न केलेल्या त्या तरुणाचे हैद्राबादमधून अपहरण केले होते. याप्रकरणी तेलंगणा राज्यातील वनस्थळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हैद्राबादवरुन पुण्याकडे जात असताना वरवडे टोलनाक्यावर नाकाबंदी करुन टेभुर्णी पोलिस व महामार्ग पोलिसांनी आरोपींना अटक करुन त्या प्रेम विवाह केलेल्या तरुणाची सुटका केलीय.

0 Comments