google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आपल्या फोर व्हीलरमध्ये कधीच बसवू नका ‘ही’ गोष्ट; तब्बल 5000 रुपयांचा बसेल भुर्दंड

Breaking News

आपल्या फोर व्हीलरमध्ये कधीच बसवू नका ‘ही’ गोष्ट; तब्बल 5000 रुपयांचा बसेल भुर्दंड

 आपल्या फोर व्हीलरमध्ये कधीच बसवू नका ‘ही’ गोष्ट; तब्बल 5000 रुपयांचा बसेल भुर्दंड

आपण जशी आपल्या शरीराची काळजी घेतो, अगदी तशीच काळजी गाडीचीही घ्यायला हवी. पण अतिकाळजी कायमच घातक असते, हेही लक्षात घेणे, गरजेचे आहे. काही लोक गाडीला विचित्र आणि कर्कश होर्न लावतात तर काही लोक इतरांना त्रास होईल, असे सायलेन्सर बसवतात. यासाठी वाहतूक पोलीस दंड आकारत असतातच. मात्र आता आज आम्ही जी माहिती तुम्हाला सांगणार आहोत, ती वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.


आपली गाडी खराब होऊ नये किंवा कधी चुकून अपघात झाल्यास जास्त नुकसान होऊ नये, यासाठी बुल बार (बंपर) लावत असतात. हे कारच्या पुढे आणि मागे लावले जाते. मात्र हे बुल बार म्हणजेच बंपर लावणे, बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आहे. जर तुम्हीही असे बेकायदेशीर बंपर लावले असेल तर तुमच्यावर खटला चालवला जावू शकतो. नियमांचे उल्लंघन केल्याने तुमच्यावर १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड सुद्धा लावला जावू शकतो.


याही गोष्टींकडे द्या लक्ष :-

तुमच्या गाडीवर लावलेले क्रॅश गार्ड दुर्घटनेच्या स्थितीत एअरबॅगला ओपन करण्यास अडचण येवू शकते. क्रॅश गार्डला गाडीच्या चैसी (Chassis) वर फिट केले जाते. दुर्घटनेच्या स्थितीत क्रॅश गार्ड लावल्याने चैसीला नुकसान होऊ शकते. ज्यावेळी कोणतेही वाहन पायी चालणाऱ्या व्यक्तीला धडक देते. त्या धडकेत ती व्यक्ती गंभीर होते. ही धडक कारची नसून ती बुल गार्डची असते.

Post a Comment

0 Comments