google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चला सोलापूरकरांनो, बघता काय सहभागी व्हा...! जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

Breaking News

चला सोलापूरकरांनो, बघता काय सहभागी व्हा...! जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

 चला सोलापूरकरांनो, बघता काय सहभागी व्हा...! जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

सोलापूर, दि. 18 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त "माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य" ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याने जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.


या स्पर्धेत प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत गायन, व्हिडीओ मेकिंग आणि भीत्तीचित्र स्पर्धा अशा एकूण पाच स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी दि. 15 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचे नियम, अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ ला भेट द्यावी. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.


 त्याचप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात. तसेच ईमेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा, असे भारत निवडणूक आयोगाने कळविल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments