पाचेगाव बु. चे सिद्धार्थ कांबळे बनले मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन..!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील व प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला नूतन चेअरमनचा सत्कार
सांगोला : तालुका प्रतिनिधी पाचेगाव बुद्रुक ता. सांगोला येथील मूळ रहिवासी असलेले आणि गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून परिसरात आपले वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण केलेल्या सिद्धार्थ कांबळे यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.
हजारो कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी गुरुवार दि. ०३ फेब रोजी मुंबई येथे सत्कार केला. यावेळी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.
या सत्कार समारंभात बोलताना मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोला तालुका हा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या पुरोगामी विचारांवर चालणारा तालुका आहे. खुद्द शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या तालुक्याचे देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा विचार व नेतृत्व सांगोला तालुक्याने नेहमीच स्वीकारले.
याच सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक सारख्या अत्यंत छोट्याशा खेड्यातून व्यावसायिक कामानिमित्त मुंबई येथे येऊन स्थायिक झालेल्या सिद्धार्थ कांबळे यांनी शरदचंद्रजी पवार यांचे विचार व नेतृत्व स्वीकारून केलेले
कार्य आणि सहकार क्षेत्रात दिलेले योगदान खरोखरच उल्लेखनीय व आदर्शवत असेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सिद्धार्थ कांबळे यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या निरपेक्ष कामाची पोहोच पावती म्हणून पक्षाने त्यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदी काम करण्याची संधी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमीच काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळते हे या निमित्ताने पुन्हा एकदा पवार साहेबांनी यांनी सिद्ध केले आहे. सिद्धार्थ कांबळे यांच्या निवडीमुळे संपूर्ण
सांगोला तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपणास अभिमान वाटत असल्याचेही शेवटी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.
0 Comments