संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदी जयमालाताई गायकवाड तर सचिवपदी तहसीलदार अभिजीत पाटील
सांगोला : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील निराधार नागरिकांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळवून देत त्यांना आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना या शासकीय योजनेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांची तर सचिवपदी तहसीलदार अभिजीत पाटील यांची निवड झाली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सदर बाबतीत अधिकृत पत्र काढून या शासकीय समितीची घोषणा केली आहे.
12 सदस्य असलेल्या या शासकीय समितीची जिल्हाधिकार्यांनी नुकतेच अधिकृत घोषणा केली आहे.
यामध्ये चंद्रकांत कारंडे, विजय पवार, शिवाजी कोळेकर, संजय देशमुख, संजय मेटकरी, दादासो वाघमोडे, पंकज काटे, विलास पाटील, वंदना सरगर आदींसह सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदींचा सदस्य म्हणून समावेश आहे.
समाजातील दुर्बल निराधार व शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून आर्थिक अनुदान देऊन त्यांना मदतीचा हात दिला जातो सांगोला तालुक्यातील हजारो नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत यामुळे निराधार दुर्बल व दुर्लक्षित नागरिकांच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. याद्वारे शासनाकडून आर्थिक मदतीचा हात मिळत असल्याने अनेकांचे जीवन सुसह्य झाले आहे.
समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या जयमालाताई गायकवाड या गेली 25 वर्षे सक्रिय राजकारणात सहभागी आहेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणाच्या माध्यमातून जि.प.सदस्य, सभापती व जिल्हा परिषद अध्यक्षा या पदापर्यंत मजल मारली आहे. शिवाय, सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राज्याच्या उपाध्यक्षा आहेत.
त्यामुळे केवळ सांगोला तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात जयमालाताई गायकवाड यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील वंचित, निराधार, उपेक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नागरिकांनालाभ होईल असे बोलले जात आहे.
जास्तीत जास्त निराधार लोकांना लाभ मिळवून देणार
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील वंचित, दुर्बल आणि निराधार नागरिकांना शासकीय अनुदान मिळवून देणार. तालुक्यातील जे नागरिक या योजनेचा लाभ मिळवून घेण्यास पात्र आहेत
परंतु त्यांना या योजनेतून अनुदान मिळत नाही त्यांनी या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला येथील कार्यालयाशी किंवा आपल्याशी संपर्क साधावा मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या योजनेतून जास्तीत जास्त निराधार नागरिकांना शासनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी व अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू ;
सौ.जयमालाताई गायकवाड
0 Comments