ब्रेकींग कर्नाटकात बनावट 'स्टँडर्ड' सिगारेट बनवून सोलापुरात विक्री सव्वा चार लाखाचे सिगारेट जप्त दोघांना घेतले ताब्यात
सोलापूर : कर्नाटकातील कलबुर्गी याठिकाणी स्टॅंडर्ड कंपनीचे भासवून बनावट सिगारेट बनवून ते सोलापुरात विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. सोलापूर व कलबुर्गी या ठिकाणी छापा टाकून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत सुमारे चार लाख 18 हजाराचे बनावट सिगारेट जप्त केले आहेत.
सोलापूर शहरामध्ये स्टेशन रोड येथील सुपर पान शॉपमध्ये प्रतिबंधीत केलेले सिगारेट विक्री केले जात असलेबाबतची गोपनिय माहिती प्राप्त झाल्यानंतर माहितीच्या अनुषंगाने सुपर पान शॉप, स्टेशन रोड सोलापूर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी परवेज इब्राहीम बागवान याने त्याचे पान शॉपमध्ये एकुण ६३ हजार ९२२ रुपयांचे प्रतिबंधीत सिगारेट त्यावर कोणताही वैधानिक इशारा किंवा सचित्र माहितीची जाहीरात नसलेल्या अवैध सिगारेट साठा करून विक्री करीत असताना मिळुन आला.
त्याला ताब्यात घेऊन सदरचा माल जप्त करण्यात आला. या बाबत सदर बझार पोलीस ठाणे येथे भा.द.वि. संहिता कलम १८८ सह सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधि. २००३ ( COTPA ACT ) कलम ७ (२) सह २०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा तपासकरीत असताना
सदर गुन्हयातील आरोपी नामे मोहमद अझर मो. दाऊद शेख याचे सना एंटरप्राजेस ऑर्चिड मॉल कामत हॉटेल कॉर्नर कलबुर्गी राज्य कर्नाटक याठिकाणी विशेष पथकासह जाऊन येथुन देखिल ४,१८,७१२ रुपयांचे प्रतिबंधीत सिगारेट त्यावर कोणताही वैधानिक इशारा किंवा सचित्र माहितीची जाहीरात नसलेल्या अवैध सिगारेट जप्त करण्यात आले.
ही कारवाई सपोनि जीवन निरगुडे, पोह दिलीप भालशंकर पोना योगेश बर्डे, पोना बाजीद पटेल, पोकॉ संजय साळुंखे, चालक पोकॉ नरेंद्र नक्का यांनी केलेली आहे..
0 Comments