जि.प.शाळा अचकदाणीचे मुख्याध्यापक यांच्याकडून शालेय कमिटीच्या रकमेचा अपहार
सांगोला पंचायत समितीच्या ही अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप , शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांचे मात्र दुर्लक्ष
सांगोला / निखिल काटे सांगोला येथील अचकदाणी गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम कांबळे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोले खाते क्रमांक ३५८८०५२३८ ९ १ या खात्यावरील शिल्लक असणारी रक्कम शासनाकडे वर्ग करावयाची असून त्याचे परिपत्रक आले होते .
सदर चे परिपत्रक २५/१०/२०२१ रोजी जा.क्र , जि.प.सो / शिक्षण / समग्र / लेखा ६१२१ सोलापूर २५/१०/२०२१ पत्र पाहिल्यानंतर धनाजी काशिनाथ काटे ( शिक्षण कमिटी अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा , अचकदाणी ) मुख्याध्यापकांनी कोऱ्या चेकवर सही करा मी सांगोल्यात शिक्षण विभागात जाऊन साहेबांना विचारून चेकवर नाव टाकतो .
व शासन नियमाप्रमाणे २५ नोव्हेंबर चे पत्रानुसार रक्कम वर्ग करतो असे म्हणुन आल्यामुळे धनाजी काटे यांनी कोरा चेक वर सही केली . सदर काही दिवसांनी धनाजी काटे अध्यक्ष नात्याने मुख्याध्यापकांना वारंवार शिल्लक असणारी रक्कम चेक वर कोणाचे नाव टाकले व कोणाकडे वर्ग केले याची मला माहिती द्या .
बँकेचे पासबुक दाखवा स्टेटमेंट दाखवा त्यांनी बँकेचे पासबुक दाखविले नाही , टाळाटाळ केली . टाळाटाळ केल्याने धनाजी काटे यांना थोडी शंका आल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला या बँकेकडे २० डिसेंबर रोजी स्टेटमेंट मागितले सदरच्या स्टेटमेंट मध्ये आठ नोव्हेंबर रोजी ९ ० हजार रुपये
वरील दिलेल्या खात्यामधून ट्रान्सफर झाल्याचे स्टेटमेंटमध्ये दिसून आले . सदर बँकेत या नंबर चे खाते कोणाच्या नावावर आहे . याची खात्री केल्यावर या खात्याचे खातेदार स्वतः मुख्याध्यापक तुकाराम भिवा कांबळे असल्याची माहिती मिळाली . तरी सदर रकमेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने धनाजी काटे यांनी
सांगोला पंचायत समिती येथील शिक्षण विभागात तक्रार दाखल केली असून मुख्याध्यापक तुकाराम भिवा कांबळे यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे . परंतु अद्याप पर्यंत याची दखल गट विकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी केलेली नाही .

0 Comments