बाईक्सऐवजी आता सुसज्ज चारचाकीतून ' दामिनीं'ची गस्त ; १३ महिला पोलिसांची नेमणूक ...
सोलापूर: शहरातील रोडरोमिओंना लगाम घालण्यासाठी दोन सुसज्ज गाड्यांमधून दामिनी पथक गस्त घालणार आहे.पोलीस आयुक्तालयाने नवीन पथक नेमलेले असून, त्यांची गस्त दिवसभर असेल. दोन सुसज्ज 'स्कॉर्पिओ' गाड्या पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या उपस्थितीत दामिनी पथकाच्या स्वाधीन करण्यात आल्या. त्यामुळे रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी सोलापुरातील 'दामिनी' पथक आता सज्ज झाले आहे.
मुंबईत धडकणार मराठा बांधवांचं भगवं वादळ; नाशिकहून मराठा बांधव मुंबईकडे
पूर्वी दामिनी पथक मोटारसायकलींवरून गस्त घालत असे. मध्यंतरी काही अडचणींमुळे पथकातील महिला दामिनींची संख्या कमी झाली होती. मात्र, याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी दामिनी पथक पुनर्गठित केल आहे. यामध्ये 13 महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दामिनी पथकाच्या पुनर्गठणामुळे सोलापूर शहरातील महिला वर्गाच्या सुरक्षेत भर पडणार आहे.

0 Comments