सांगोला शहरातील मिरज रेल्वेगेट भुयारी मार्गाच्या कामानिमित्त अडीच महिने राहणार बंद !
सांगोला शहरातील मिरज रेल्वेगेटच्या ठिकाणी भुयारीमार्गाच्या कामाचा प्रारंभ सोमवार,दि.२१ फेब्रुवारी रोजी करण्यात आला . या कामाला अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे . त्यामुळे या मार्गावरची छोट्या वाहनांची वाहतूक रेल्वेच्या माळवाडी बोगद्याखालून वळवली आहे .
अवजड वाहतूक महूद रेल्वेगेट ते एखतपूर रोडमार्गे बायपास रोडला वळविण्यात आली आहे . या भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना याच पर्यायी रोडचा वापर करावा लागणार असल्यामुळे बायपास रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होणार आहे . मिरज पंढरपूर- कुडूवाडी या रेल्वेमार्गावर मालगाड्यांसह प्रवासी रेल्वेची वाहतूक वाढल्यामुळे सातत्याने सांगोला शहरातील मिरज रेल्वेगेट व महूद रेल्वेगेट बंद करावे लागते .
त्यामुळे दुचाकी , चारचाकी वाहनांना गेटमधून पुढे रेल्वे जाईपर्यंत गेटच्या दुतर्फा थांबून वेळ जाण्याबरोबर अनेक वेळा गेट अडकून राहिल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सोसावा लागत होता . सुरुवातीला या दोन्ही रेल्वेगेटच्या ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करावी , अशी मागणी होती .
परंतु उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर रस्त्यालगत असणारे उद्योग , व्यवसाय यांना फटका बसणार होता . त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून याठिकाणी उड्डाणपुलाऐवजी बोगद्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला गेला . दरम्यान , आता मिरज रेल्वेगेटच्या ठिकाणी प्रत्यक्षात रेल्वेच्या भुयारीमार्गाच्या कामास सुरुवात झाली असून मिरज रेल्वेगेटच्या भुयारीमार्गावर पावसाळ्यात पाणी साचणारनाही .
याची विशेष दखल घेऊन बोगद्याची निर्मिती केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अभियंत्यांनी सांगितले . बोगद्याचे काम सुरू होणार म्हणून खड्डे बुजवण्याचे काम बायपासवरील पूर्ण झाले आहे . शहरातील छोटी वाहतूक माळवाडीच्या रेल्वे भुयारीमार्गातून व मोठी वाहतूक महूद रेल्वेगेट ते एखतपूर रोडमार्गे बायपास रोडला वळवण्यात आली आहे .
0 Comments