google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी … ‘या’ राज्यात झाली वीकएंड लॉकडाउनची घोषणा

Breaking News

मोठी बातमी … ‘या’ राज्यात झाली वीकएंड लॉकडाउनची घोषणा

 मोठी बातमी … ‘या’ राज्यात झाली वीकएंड लॉकडाउनची घोषणा


संपूर्ण देशात ओमिक्रॉन पाठोपाठ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचा मोठा खुलासा टास्क फोर्सने केला आहे. यामुळे सरकारी यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. दरम्यान राज्यातील बड्या मंत्र्यांना व नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच लॉकडाउनबाबत मोठे विधान केले होते. राज्याची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने सुरू आहे, असे महत्त्वाचे वक्तव्य अजितदादांनी केले होते. 



दरम्यान राजधानी दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाचा विस्फोट होत आहे. त्यातच या राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रसार नवी दिल्लीत वेगाने होत आहे. परिणामी या राज्यात वीकएंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी नवी दिल्लीत आता शनिवार आणि रविवारी संपूर्णत: लॉकडाउन असणार आहे.



 कोरोना वाढत असल्यामुळे या राज्यातील शाळा यापूर्वीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आता नवी दिल्लीत नाईट कर्फ्यू सुरू आहे. या उपाययोजना करूनही काहीच उपयोग न झाल्याने शेवटी वीकएंड लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.



 मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे दिल्लीत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. इतकेच नव्हे तर काल सोमवारी दिल्लीत कोरोना विषाणूचे सुमारे 4 हजार 99 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळेच वीकएंड लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments