सोलापूर : "पुन्हा मीच राहणार" | एनसीपी जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या चेहऱ्यावर हास्य
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी पक्षांतर्गत कुरघोड्याना वैतागून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी लगेचच मुंबई मध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांचे बरेच समर्थक मंडळी उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील यांच्या भेटीमध्ये समर्थकांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होईपर्यंत काका साठे हेच जिल्हाध्यक्ष राहावे अशी मागणी केली. माजी जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील हे पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी उत्सुक असल्याने जयंत पाटील हे दिपक आबा यांच्या बाजूने असल्याची माहिती समोर आली आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आबांच्या अध्यक्ष पदाला विरोध असल्याचे समजते.
त्यामुळे तूर्त काका साठे हेच जिल्हा अध्यक्ष राहणार आहेत, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या काका साठे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचं आता स्पष्ट झाल आहे. त्यामुळे इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फिरल्याचं बोलले जातयं.
दरम्यान दोन दिवसाच्या गोंधळानंतर शुक्रवारी जिल्हाध्यक्ष काका साठे हे जिल्हा परिषदेमध्ये आले असता त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं, जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे नातू जयदीप साठे,उपसभापती जितेंद्र शिलवंत, रामेश्वर मासाळ, लतीफ तांबोळी, मनोज साठे ही नेते मंडळी होती. जिल्हाअध्यक्ष पदावर 'पुन्हा मीच राहणार' या उत्साहात काका साठे हे जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना ही त्यांच्या चेहर्यावर उत्साह दिसत होता.
0 Comments