सांगोल्यातील तीन जणांना दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार
मंगळवेढा उपविभागतील सांगोला तालुक्यातील तीन जणांना मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (ब) नुसार उपविभागीय विभागीय दंडाधिकारी, मंगळवेढा यांच्याकडील सुनावणीनुसार
रामचंद्र साधु शेजाळ रा.बागलवाडी, कुंडलिक भाऊ लवटे रा.बुध्देहाळ, किरण कैलास केदार रा.वासुद ता.सांगोला यांना दोन वर्षाकरीता सोलापूर, सातारा, सांगली या जिलह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी आदेश दिले आहेत. ”
किरण कैलास केदार यांच्यावर लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यात धाकाने प्रवृत्त करण्यासाठी हमला करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या हेतूने जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पुंडलिक भाऊ लवटे यांच्यावर गोरगरीब लोक व महिलांना मारहाण करणे, घातक हत्यारे जवळ घेऊन फिरणे लोकसेवक आला मारहाण करणे आधी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तसेच रामचंद्र साधू शेजाळ यांच्यावर घातक शस्त्र जवळ बाळगणे, शेतातील माल चोरने, मारहाण करून पैसे घेणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तीन जणांचा समावेश असून, गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जनतेस धोका निर्माण झाल्याने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढा यांनी पुढील दोन वर्षाकरीता तीन जणांना तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यातआले आहे.
उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढा यांच्या लेखी परवानगीशिवाय तीनही जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करता येणार नाही. तसेच तीन जिल्ह्याव्यतिरिक्त राज्यात कोठेही रहिवास करणार असेल तर त्या रहिवास नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तसेच
सांगोला पोलीस स्टेशनला महिन्यातून एकदा पोस्टाने अथवा प्रतिनिधीमार्फत लेखी माहिती देणे बंधनकारक असेल. तसेच राज्याच्या बाहेर निघून जाण्याचे असल्यास दहा दिवसाच्या आत संबंधित पोलीस स्टेशनला व सांगोला पोलीस स्टेशनला माहिती पोस्टाने अथवा प्रतिनिधी मार्फत लेखी स्वरूपात देणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी कळविले आहे.

0 Comments