'या' जिल्ह्यातील शाळा ३१ जानेवारीपासून होणार सूरु
रायगड – राज्यात कोरोनाचा वाढत असल्याचे राज्य सरकारने पुन्हा एकदा दोन वर्षानंतर सुरू झालेल्या शाळेत बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यात रूग्ण संख्या कमी होत आहे त्या जिल्ह्यात शाळा सूरु करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
याच निर्णयानुसार रायगड जिल्हयातील शाळा ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. जिल्हयातील पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शाळा सुरू करण्याला मान्यता दिली असून तसे आदेश जारी केले आहेत. मात्र पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू होणार नाहीत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला. त्यानुसार अनेक भागातील शाळा २४ जानेवारीपासून सुरू देखील झाल्या . मात्र रायगड जिल्हयातील शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्गातही उत्सुकता होती. रायगड जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक २८ जानेवारी रोजी पार पडली.
या बैठकीत झालेल्या चर्चेअंती ३१ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यास टास्कफोर्सने हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील शाळा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असून तसे परीपत्रक जारी केले आहे.

0 Comments