google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 टेंभुर्णी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी जगताप, उपाध्यक्षपदी चांदगुडे यांची निवड सचिवपदी सुरज देशमुख

Breaking News

टेंभुर्णी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी जगताप, उपाध्यक्षपदी चांदगुडे यांची निवड सचिवपदी सुरज देशमुख

 टेंभुर्णी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी जगताप, उपाध्यक्षपदी चांदगुडे यांची निवड


सचिवपदी सुरज देशमुख 


प्रतिनिधी / टेंभुर्णी : टेंभुर्णी प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांची मिटिंग २४ डिसेंबर रोजी सायंकाळी टेंभुर्णी चायनीज हट येथे होऊन त्यामध्ये पत्रकार नूतन अध्यक्ष अनिल जगताप यांची एकमताने बिनविरोध एक वर्षासाठी निवड करण्यात आली. ही निवड झाल्याबद्दल मावळते अध्यक्ष पत्रकार संतोष पाटील यांनी शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करुन अभिनंदन केले. तर पत्रकार सतीश चांदगुडे यांची उपाध्यक्ष पदासाठ बिनविरोध निवड झाल्याबद्दल पत्रकार सतीश काळे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार सुरज देशमुख यांची सचिव पदासाठी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार  पत्रकार सचिन होदाडे  यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सचिन होदाडे यांनी प्रस्ताविक केले. टेंभुर्णी प्रेस क्लबबाबत पत्रकार डी. एस. गायकवाड, आबासाहेब साळुंखे, सदाशिव पवार, सोपान ढगे यांनी मार्गदर्शन केले.



या वेळी मावळते अध्यक्ष संतोष पाटील, डी. एस. गायकवाड, सदाशिव पवार, आबासाहेब साळुंखे, सचिन होदाडे, सतीश काळे, सोपान ढगे, गणेश चौगुले आदी पत्रकार उपस्थित होते. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मावळते अध्यक्ष संतोष पाटील यांनी याप्रसंगी शुभेच्छापर भाषण केले व प्रेस क्लबच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments