राजमाता महिला पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
सांगोला/ प्रतिनिधी:सांगोला येथील राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्योती चोरमुले यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात खूप कामगिरी केली आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतीबा फुले यांच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा याठिकाणी सुरू केली. त्यामुळे आज मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. म्हणून हा दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो.
सावित्रीबाई फुले यांना क्रांतीज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा या महान महिलेचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी पुणे येथे झाला असल्याचे ज्योती चोरमुले यांनी सांगितले.
यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राणीताई माने, चेअरमन सौ. अप्सराताई ठोकळे, व्हा. चेअरमन सौ. प्रियांका श्रीराम, दीपमाला सरगर, सौ. छायाताई मेटकरी, ज्योती चोरमुले, पतसंस्थेच्या संचालिका नकुशा जानकर, सचिव मनिषा हुंडेकरी, क्लार्क पल्लवी कांबळे, अर्पणा जानकर आदी महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार सौ. मनिषा हुंडेकरी यांनी मानले.
0 Comments