google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधणार आमदार ॲड.शहाजी बापू पाटील यांची घोषणा.

Breaking News

सांगोल्यात पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधणार आमदार ॲड.शहाजी बापू पाटील यांची घोषणा.

 सांगोल्यात पत्रकारांसाठी पत्रकार भवन बांधणार आमदार ॲड.शहाजी बापू पाटील यांची घोषणा.


सांगोला - पत्रकार दिनानिमित्त आमदार ॲड.शहाजी बापू पाटील  यांच्या कार्यालयामध्ये सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांच्या मागणीला उत्तर देताना तालुक्यातील पत्रकारांसाठी एक सुसज्ज पत्रकार भवन बांधून देणार



 याबाबतची घोषणा शहाजीबापू पाटील यांनी केले आहे. पत्रकार दिनानिमित्त सांगोला तालुक्यातील सर्व पत्रकार यांचा सत्कार समारंभ आमदार ॲड.शहाजी बापू पाटील  यांनी आयोजित केला होता त्यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे. स्व. मीनाताई ठाकरे व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली


 

      त्यावेळी सांगोला तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगोला तालुक्यासाठी बापू तुम्ही लाखो रुपयांचा निधी विकास कामासाठी खर्च केला आहे



 तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा, तालुक्यातील रस्ते आरोग्य विभागासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून तो खर्च केलेला आहे त्यामुळे तालुक्‍यातील विकासाला चालना मिळालेली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.



 त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यातील पत्रकारांचा देखील पत्रकार भवन चा विषय मार्गी लावावा, गेले अनेक दिवसांपासून पत्रकार भवनचा विषय प्रलंबित आहे जर तुमच्या माध्यमातून पत्रकार भवन झाले तर त्याच पत्रकार भवन मध्ये सर्व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने बापू तुमचा सत्कार केला जाईल अशा पद्धतीची याबाबतची मागणी रविंद्र कांबळे यांनी केले .



"तालुक्‍यातील पत्रकारांसाठी 20 लाख रुपयांचे एक सुसज्ज पत्रकार भवन बांधून देणार व जमीन खरेदी साठी पैशाची गरज लागल्यास मी स्वतःच्या खर्चाने जमीन खरेदी साठी मदत करणार असल्याची घोषणा आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले" 

       त्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने शहाजीबापू पाटील यांचे आभार मानले.

 


         यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष कमरुद्दीन खतीब ज्येष्ठ नेते शहाजी नलवडे मा नगराध्यक्ष रफिक नदाफ यासह पत्रकार उपस्थित होते पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवी प्रकाश साबळे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय बाबर व पत्रकार दत्तात्रय खंडागळे यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकार भवन चा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments