google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अत्यंत दुर्दैवी ...शेततळ्यात बुडून तीन बालिकांचा मृत्यू !सोलापूर जिल्हा हादरला !

Breaking News

अत्यंत दुर्दैवी ...शेततळ्यात बुडून तीन बालिकांचा मृत्यू !सोलापूर जिल्हा हादरला !

 अत्यंत दुर्दैवी ...शेततळ्यात बुडून तीन बालिकांचा मृत्यू !सोलापूर जिल्हा हादरला !



सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेततळ्यात बुडून तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला आहे .



शेततळ्यात छोटी मुले पडून त्यांचा बुडून मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत तरीही सुरक्षेची खबरदारी घेतली जात नसून पुन्हा पुन्हा अशा घटना समोर येत आहेत. शेततळ्यात पडून आणि बुडून प्रौढ व्यक्तीही मृत्युमुखी पडलेल्या घटना घडत असताना लहान मुलांना 



अशा तळ्यापासून दूर ठेवण्याची गरज असली तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही त्यामुळे अशा प्रकाराने मोठे अपघात घडतात आणि कोवळे जीव विनाकारण जातात. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात आज अशीच दुर्दैवी घटना घडली आणि अवघ्या गावावर शोक करण्याची वेळ आली. 



११ वर्षे वयाची आकांक्षा युवराज वडजे, १३ वर्षे वयाची पूजा सोनार आणि १७ वर्षे वयाची सानिका सोनार अशा तीन मुली एकाच शेततळ्यात पडल्या आणि बुडून मृत्युमुखी पडल्या आहेत. ही दुर्दैवी घटना समोर आली तेंव्हा एकाच खळबळ उडाली आणि संपूर्ण मार्डी गाव शोकसागरात बुडाले. गावावर आज शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश अंगावर काटा आणणारा होता.



घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरु केली. ही घटना एक अपघात आहे की घातपात आहे याबाबतही शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. पोलीस तपासानंतर यातील सत्य बाहेर येणार आहेच पण तीन अल्पवयीन मुलींचा जीव गेल्याने परिसर हादरून गेला आहे.

Post a Comment

0 Comments