काळजाचा थरकाप उडवणारा अपघात ; ब्रिजला गाडीची धडक झाल्यानं चौघांचा मृत्यू
सोलापूर- विजापूर रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 4 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे.मंगळवारी पहाटे हा अपघात घडला आहे. सोलापूर- विजापूर रस्त्यावरील कवठे गावाजवळ हा अपघात घडला आहे.
काम सुरु असलेल्या ब्रिजला Mahindra XUV500 या गाडीने धडक दिल्याने अपघात घडला आहे. गाडीमधील 5 ही जण कर्नाटकमधील असल्याची माहिती मिळत आहे. अरूण कुमार लक्ष्मण, मेहबुब मोहम्मद अली मुल्ला, फिरोज सैफसाब शेख, मुन्ना, केंभावे अशी अशी अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत.
सोलापूर -विजापूर रस्त्यावरील ब्रिजचं काम सुरु आहे. या ब्रिजला चारचाकीने येऊन धडक दिल्याने गाडीतील लोकांना जोरात फटका बसला. यामुळे गाडीतील 4 जण जागीचं दगावले. या अपघातात गाडीचं फार मोठं नुकसान झालं आहे. गाडीच्या ड्रायव्हरला अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताचं पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले आहेत. जखमीला रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहेत. यावेळी पोलिसांनी नागरिकांना वाहन चालवताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
0 Comments