सोलापूर जिल्हा प्रशासनाचे आदेश ; सर्व हॉस्पिटलना सूचना, तातडीने हे करा
सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध आणखी वाढवण्यात आले आहेत मुंबई पुणे या शहरांमध्ये वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या पाहता सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागातील सर्व हॉस्पिटलला त्वरित फायर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या आहेत तसा आदेश यांनी जारी केला.
सुधारित आदेशः
ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोटकलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ चे खंड २, ३ व ४ मधील तरतूदींनुसार दिनांक १४ मार्च, २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली असून, त्यातील नमूद नियम १० नुसार सदर नियमांची अंमलबजावणी करणेकामी जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
ज्याअर्थी, शासनाने जिल्ह्यातील DCH/ DCHC मधील ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा, फायर सेफ्टी तसेच विद्युत यंत्रणा इत्यादी बाबींची तपासणी तातडीने करणेबाबत निर्देश दिले आहेत.
ज्याअर्थी, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ आणि National Building Code Of India Part IV अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील आपत्ती प्रतिबंधात्मक विषयक तरतुदी अन्वये सोलापूर शहर आणि जिल्हयातील सरकारी, धर्मदाय संस्था अंतर्गत, खाजगी रुग्णालये / दवाखाने ई. इमारतीमध्ये आग प्रतिबंधक उपाय तसेच प्रथमोपचार आणि संकटकालीन मार्ग ई.बाबत सक्तीने उपाययोजना (Fire Audit) करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी मिलिंद शंभरकर म.प्र.से. जिल्हाधिकारी तथा पदसिध्द अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून वाचले क्रमांक ०७ अन्वये दिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कोव्हीड- १९ बाधित / संशियत रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांचे मार्फत मान्यता देण्यात आलेल्या DCH/ DCHC ची तपासणी करणेकामी खालील प्रमाणे अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करीत आहे.
0 Comments