google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ऊस वाहतुकीने घेतले दोन चिमुकल्यांचे बळी

Breaking News

ऊस वाहतुकीने घेतले दोन चिमुकल्यांचे बळी

 ऊस वाहतुकीने घेतले दोन चिमुकल्यांचे बळी



पंढरपूर :  पंढरपूर  जवळील पिराची कूरोली येथे ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरने, दुचाकीस जोराची धडक दिली आणि झालेल्या अपघातात दोन चिमुकले बहीण-भाऊ ठार झाल्याची घटना तीन दिवसापूर्वी घडली आहे. या घटनेमुळे ऊस वाहतूक ही एक मोठी समस्या बनत असल्याचे आणखी एकदा निदर्शनास आले आहे. 



जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्यापासून, सुरू असलेल्या ऊस वाहतुकीने अनेक जणांचे प्राण घेतले आहेत.  पुन्हा दोन चिमुकल्या बहिण- भावास आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की , मयूर औदुंबर मोरे हे बावी येथील ग्रहस्थ फलटण येथे नोकरीस आहेत .त्यांना परगावी जायचे असल्यामुळे त्यांचा मुलगा रुद्र आणि मुलगी त्रिशा यांना आपल्या मूळ गावी बावी येथे सोडावयाचे होते. यासाठी ते फलटण येथून निघून बावीकडे निघाले होते. पंढरपूर जवळील पिराची कूरोली येथे आले असता ,.मागून येणार्‍या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस मागून जोराची धडक दिली .



या धडकेत दोन्ही मुले आणि वडील दूरवर फेकले गेले .या अपघातात मुलगा रुद्र जागीच ठार झाला ,तर वडील मयूर मोरे आणि मुलगी त्रिशा मोरे हे गंभीर जखमी झाले . या दोघांना अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले . येथून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले. सोलापूर येथे दोन दिवस उपचार सुरु असताना त्रिशानेही आपले प्राण सोडले आहेत . या अपघातात दोन चिमुकले बहिण भाऊ ठार झाले तर , वडील मयूर औदुंबर मोरे हे अजूनही उपचार घेत आहेत.



 सोलापूर जिल्ह्यात अनेक साखर कारखाने असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. ही वाहने प्रमाणापेक्षा जास्त वेगाने धावत असतात. ट्रॅक्टर चालक गाण्याच्या तालात बेधुंदपणे ट्रॅक्टर चालवितात. यातच अपघातांना आमंत्रण मिळते. अशाच प्रकारे आजवर अनेक अपघात घडले आहेत .

Post a Comment

0 Comments