धनदांडग्या लाभार्थीची नावे अन्नसुरक्षा यादीतून सक्तीने कमी करून गोरगरिबांना लाभ द्यावा ; जिल्हाधिका-यांकडे निवेदन सादर करणार !
तालुका/प्रतिनिधी ;- सांगोला तालुक्यातील अनेक गावात अन्नसुरक्षा यादीत हजारोंच्या संख्येने धनदांडग्या नागरिकांची नावे संगणमत,अर्थपूर्ण वाटाघाटी करून समाविष्ट करण्यात आलेली आहेत.त्यामुळे तालुक्यातील हजारों खरे पात्र लाभार्थी या अन्नसुरक्षा योजने पासून वंचित राहिलेली आहेत.
शासनाने अनेक वेळा अश्या धनदांडग्या लोकांनी त्यांची नावे स्वतः हुन या अन्नसुरक्षा पात्र यादीतून कमी करून घ्यावीत असे आवाहन केले होते. परंतु शासनाच्या या आवाहनाला धनदांडग्या नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
गेल्या ७-८ वर्षांपासून बिनबोभाटपणे हे धनदांडगे लोक गोरगरिबांच्या हक्काचे मिळणारे रेशनचे धान्य हिरावून घेत आहेत.या धनदांडग्या लोकांची सर्व माहिती स्थानिक रास्त भाव धान्य दुकान यांचेकडे असतानाही हे रास्त भाव धान्य दुकानदार अश्या धनदांडग्या लोकांची नावे कमी करण्याचे धाडस दाखवत नाहीत.
ज्या धनदांडग्या नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेचे २-३ रुपयाने दराने धान्य मिळते ते धान्य शेकडो धनदांडगे नागरिक तालुक्यातील आठवडी बाजारात, भुसार दुकानात, किराणा दुकानात चढ्या दराने विक्री करत असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे.
परंतु ज्या गोरगरीब नागरिकांना शासनाच्या या कल्याणकारी अन्नसुरक्षा योजनेची खरचं गरज आहे.त्या नागरिकांना मात्र शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेतुन २-३रुपये दराने मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
२०१३ साली अन्नसुरक्षा योजना सुरू झाल्या पासून तालुक्यातील अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात न आलेल्या हजारो गोरगरीब नागरिकांनी पुरवठा विभागाकडे अर्ज करून अन्नसुरक्षा योजनेत नावे समाविष्ट करून घ्यावी म्हणून हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत मात्र त्या पैकी एकाही अर्जावर पुरवठा विभागाने दखल घेतली नाही.
त्यामुळे २०१३ सालच्या अन्नसुरक्षा यादीत संगणमताने,गोरगरिब पात्र लाभार्थ्यांना डावलून ज्या ज्या धनदांडग्या नागरिकांची नावे या अन्नसुरक्षा यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
ती नावे तातडीने कमी करुन २०१३ रोजीपासुन वंचित असणाऱ्या तालुक्यातील अपंग, निराधार महिला, गोरगरीब ख-या पात्र लाभार्थ्यांना या अन्नसुरक्षा योजनेचा लाम मिळवून द्यावा अशी मागणी सन २०१३ पासून अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित असणा-या गोरगरीब नागरिकांमधून होत आहे.

0 Comments