अत्यावश्यक सेवा सोडून इतर सेवांवर बंदी घालण्यात येईल - राजेश टोपे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाण्याची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत महत्वाची खुलासा केला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सातत्यानं कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता चिंताही व्यक्त केली. काही महत्त्वाचे मुद्दे प्रकाशझोतात आणले. ज्यानंतर त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना टोपे यांनी महत्त्वपूर्ण इशारा देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात सध्या रुग्णसंख्या ज्या वेगानं वाढत आहे, ते पाहता तीन दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण दुपटीनं वाढत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं.
याच पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांमध्ये लॉकडाऊनची भीती पाहायला मिळत आहे. याबाबतचं चित्र राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.100 लॉकडाऊन लागनार नसल्याने स्पष्ट केले. सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. त्यानुसार गर्दी करणाऱ्या गोष्टींवर काही निर्बंध टाकण्यासाठी निर्णय घेतला जाईल. टास्क फोर्सनं ऑग्युमेंटेड रेस्ट्रीक्शन्सचा मुद्दा समोर ठेवल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा-सुविधांची फारशी आवश्यकता नाही, अत्यावश्यक सेवांमध्ये ज्याची गणती केली जात नाही अशा पद्धतीच्या सेवा, सुविधा आणि प्रक्रिया धीम्या गतीनं करण्याच्या किंवा त्या थांबवण्यासाठी पावलं उचलली जाऊ शकतात
असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, अत्यावश्यक या वर्गात न मोडणाऱ्या सुविधांमध्ये उद्यानं, मॉल, सलून- पार्लर, शिकवणी वर्ग, अत्यावश्यक वस्तू वगळता इतर वस्तूंची दुकानं आणि महत्त्वाच्या कारणाव्यतिरिक्त करण्यात आलेला प्रवास या साऱ्याचा समावेश आहे.
0 Comments