google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ, हल्लेखोरांची नावे निष्पन्न

Breaking News

पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ, हल्लेखोरांची नावे निष्पन्न

 पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ, हल्लेखोरांची नावे निष्पन्न



पुण्याच्या लोणीकंद  परिसरात आज (बुधवार) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुहेरी खुनाची  घटना घडली आहे. मारेकर्‍यांनी कोयता, बेसबॉल आणि दगडाने ठेचून बाप-लेकाचा खून  केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यातील  पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी घटनास्थळी  धाव घेतली आहे.


सनी कुमार शिंदे  (22), कुमार शिंदे असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. सनी हा कुमार शिंदे यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी एका खून प्रकरणात सनी शिंदे यास अटक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासुन तरूंगात असलेल्या सनीची 3 महिन्यापुर्वी जामिनावर मुक्तता झाली. तो तरूंगाच्या बाहेर आला. आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील शाळेच्या पाठीमागे अज्ञात हल्लेखोरांनी सनी शिंदेला गाठले. त्यावर कोयता, बेसबॉलने हल्ला  चढविला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर देखील हल्लेखोरांनी त्याला दगडाने ठेचण्यास सुरूवात केली.


सनीचे वडिल कुमार शिंदे तेथे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. हल्लेखोरांच्या हल्ल्यात सनी आणि कुमार शिंदे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे पिता-पुत्राचा खून हा पुर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. लोणीकंद पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

Post a Comment

0 Comments