जन्मदात्या वडीलाचा स्वतःच्या मुलीवर अत्याचार
वडील-मुलगी या नात्याला काळीमा फासणारी घटना
ब्रम्हपुरी शहरातील टिळकनगर येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षीय निर्दयी वडीलाने स्वतःच्या १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची वडील-मुलगी या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.प्राप्त माहितीनुसार,सन २०२० ह्या वर्षातील मे महिन्यात पीडीत मुलगी ही आपल्या घरातील स्वयंपाक खोलीमध्ये झोपली होती. तेव्हा मध्यरात्री च्या सुमारास वडीलाने स्वयंपाक खोलीत प्रवेश केला. तेव्हा अचानक त्याच वेळी पाणी पिण्यासाठी पीडीतेची आई सुध्दा स्वयंपाक खोलीत गेली.
तेव्हा आरोपी वडील हा तिथून निघून गेला. त्यानंतर पीडीतेच्या आईने आपल्या मुलीला सदर बाबतीत विचारपूस केली. तेव्हा पीडीत मुलीने वडीलांनी बळजबरी करून अत्याचार केल्याबाबत आपल्या आईला सांगितले. तेव्हा आरोपी हा घरातील कर्ता पुरुष व पीडीतेचा वडील असुन कुटुंबाचा तो पालनपोषण करायचा त्यामुळे पीडीतेच्या आईने तेव्हा पोलीसांत तक्रार दाखल केली नाही. त्यानंतरही आरोपीची वागणूक बदलली नाही. व २९ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर रात्री ८ वाजता च्या सुमारास पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न आरोपीने केला.
त्यानंतर पीडीत मुलीच्या आईने सदर घटनेची तक्रार ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली. तेव्हा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ५०६, ३७६(१), ३७६(२)(एफ), पोक्सो ६,८,१० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.सदर घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर ह्या करीत आहेत.
0 Comments